• Tue. Mar 10th, 2026

    नगर परिषद किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते उद्घाटन; “जय शिवाजी, जय शिवराय”च्या घोषणांनी सभागृह दणाणले

    ByMH LIVE NEWS

    Feb 19, 2026
    नगर परिषद किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते उद्घाटन; “जय शिवाजी, जय शिवराय”च्या घोषणांनी सभागृह दणाणले

    किनवट प्रतिनिधी, दि. १९

    नगर परिषद किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तीभावात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. नगर परिषद सभागृहात आयोजित मुख्य कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष मोहम्मद हसन खान पठाण होते. प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी नेत्या बेबीताई नाईक यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय शिवाजी, जय शिवराय”च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
    याप्रसंगी नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांनी शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाची आठवण करून दिली. “शिवरायांचे आदर्श आजच्या प्रशासनासाठी मार्गदर्शक आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणे हीच खरी शिवजयंतीची शिकवण आहे,” असे त्या म्हणाल्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना उपनगराध्यक्ष मोहम्मद हसन खान पठाण यांनी स्वराज्य संकल्पनेचा उल्लेख करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
    कार्यक्रमास सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका यामध्ये श्रीराम नारायणराव नेम्मानिवार (सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती), श्रीमती अश्विनी आदर्श जागरलावार (सभापती, स्वच्छता व आरोग्य समिती), श्रीमती प्रिती धिरज नेम्मानिवार (सभापती, महिला व बालकल्याण समिती), श्रीमती निलोफर निसार भाटी (सभापती, पाणी पुरवठा समिती), श्रीमती नुरसबा शेख मुकद्दर (सभापती, क्रीडा व सांस्कृतिक समिती), यांच्यासह नगरसेवक संतोष किशनराव मरस्कोल्हे, गटनेते अभय मधुकर नगराळे, अपक्ष नगरसेवक चंद्रशेखर रंगराव नेम्मानिवार, सरोजिनी बाबुराव ओद्दीवार, प्रविण इंद्रसिंग राठोड, ललिताबाई मारोती मुनेश्वर, सुरज किशनराव सातुरवार, गंगाबाई नारायणराव कोल्हे तसेच साजिद खान निसार खान (स्वीकृत सदस्य) यांची उपस्थिती होती.
    यासह माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, माजी जि.प. सदस्य बंडु नाईक, ॲड. राहुल नाईक, उपसभापती राहुल नाईक, स्वागत आयनेनिवार, धिरज नेम्मानिवार, शहर प्रमुख प्रशांत कोरडे, राजेश जोशी, राजु सातुरवार, साहिल सिरमनवार, आदर्श जागर्लावार, प्रभु कोल्हे, मुक्कदर शेख, मुकेश नेम्मानिवार, ॲड. दिनेश येऊतकर, शिवसेना महिला तालुका संघटक मंगल तोकलवाड, प्रा. जयश्री भरणे, संगिता आडे, सागर गायकवाड यांच्यासह बांडी यांची उपस्थिती होती.
    मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यालयीन अधीक्षक अशोक भालेराव, लेखापाल विष्णू पुजारी, अभियंता सुरज साखळे, नगर रचना अभियंता स्वानंद मामीडवार, अभियंता राहुल सातुरवार, करनिर्धारक शिवराम काहीतवाड, पाणी पुरवठा सहाय्यक राजू पिल्लेवार, किरण कलगोटूवार, फारुख खत्री, परमेश्वर कचमोडे, लक्ष्मण कोल्हे, साहिल कशेटवर, राजू उदगीरवार, जमीरोद्दीन, किरण दुधीवार, मोहनिश ढंडोरे, गंगाधर दोनपेल्लीवर व इतर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टॅलिन आडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक भालेराव यांनी केले. सराफराज खुरेशी यांनी शिवरायांच्या विचारांचा जागर केला. शिवजयंती निमित्त सभागृहात शिवकालीन पराक्रम, स्वराज्य स्थापना, प्रशासनातील शिस्त व स्त्री सन्मान यांसारख्या विषयांवर माहिती देण्यात आली. उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याचा आदर्श अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.
    एकूणच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किनवट शहरात देशभक्ती, अभिमान आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed