• Sat. Mar 7th, 2026

    Sunil Tatkare : ‘अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी’, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

    Sunil Tatkare : ‘अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी’, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण सुनील तटकरे यांनी सपष्ट केलं आहे. “आम्ही आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित दादांचा जो अपघाती निधन झालं त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं. या संबंध प्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वस्त केलं की, उद्या केंद्रीय गृह मंत्र्यांकडे राज्य सरकारकडून पत्र व्यवहार केला जाईल. ही सर्व चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सीबीआयच्या माध्यमातून करु इच्छित आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून पावलं उचली जाणार आहेत”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

    “सीबीआय तपास करेल तेव्हा आणखी व्यापक पद्धतीने तपास होऊ शकतो. ज्यावेळेला स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळेला बाह्य देशातील सुद्धा तपास यंत्रणांची मदत होऊ शकत असते. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सखोल पद्धतीने तपास व्हावा अशी मागणी आहे. या प्रकरणात जे मुद्दे उपस्थित होतात त्या मुद्द्यांसह तपास केला जावा आणि तपासाचा निष्कर्ष लवकराच लवकर देशाच्या जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका होती. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि प्रदीर्घ चर्चा केली”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

    रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांची भेट

    दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीवरही सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. आमची आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ सुद्धा भेट झालेली होती. त्या भेटीचं कारण वेगळं होतं ते मी तुम्हाला सांगेलच. राज्यभरात जिल्हा परिषदाच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यामध्ये आपण कशाप्रकारे एकत्रपणे वाटचाल करु शकतो, याबाबत त्यांनी चर्चा केली”, असं तटकरे यांनी सांगितलं.

    “त्यांच्याकडे वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये काय संख्याबळ आहे याची माहिती होती. माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याबाबत माहिती होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका काय या संदर्भात आम्ही चर्चा केली. मग या सदंर्भातील निर्णय एकत्रितपणे कसा घेता येईल, याबाबत आम्ही चर्चा केली. चर्चा अतिशय समाधानकारक होती. सौहार्दाच्या वातावरणात होती. भाजप आमच्या एनडीएमधला प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मित्रपक्षांचा सन्मान आणि आदर करण्यातून अत्यंत चांगली चर्चा झाली”, अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा