कोपरगाव तालुक्यातील माजी सरपंचाने महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केला. दोन वर्षांपासून फोनवर छळ करणाऱ्या अशोक भोकरे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अटकेसाठी ग्रामसेवक संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दीड ते दोन वर्षांपासून सुरु होता प्रकार
या फिर्यादीत सदर महिलेने पुढे म्हटले आहे की, माजी सरपंच भोकरे दीड ते दोन वर्षांपासून मला वारंवार फोन करून तुम्ही आज छान साडी घातली .खूप छान दिसतात. कधीकधी तुम्ही खूप सुकलेल्या दिसतात .आज खूप टेन्शन आहे का? मी येऊ का टेन्शन दूर करायला म्हणून माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असून सदर इसमा विरुद्ध माझी तक्रार आहे असे म्हणत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपीला अटक झाली नसल्याने कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देऊन सदर आरोपीला दोन दिवसात अटक करा अशी मागणी केली आहे.
Sunil Tatkare : ‘अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी’, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
अटक झाली नाही तर…
आरोपीला दोन दिवसात अटक झाली नाही तर आम्ही सर्व काम बंद आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आणि आरोपीला अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
