मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झालेल्या एसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मंत्र्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे सध्या अडचणीत सापडले आहेत. नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात काम करत असणारा एक कारकून लाच घेताना रंगेहात पकडला गेला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मंत्रालयात जावून सापळा रचला आणि संबंधित कारकुनाच्या रंगेहात मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली होती. चक्क मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात अशाप्रकारचं कृत्य कसं होऊ शकतं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज माध्यमांसमोर येत सविस्तर भूमिका मांडली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी नरहरी झिरवळ यांच्यासह सर्व मंत्र्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
“अशा घटनांमुळे निश्चित प्रतिमा मलिन होते. आपल्या कार्यालयात नेमला जाणारा स्टाफ हा सुद्धा चिकित्सा करुन नेमला जावा. मंत्री म्हणून सूचना गेली पाहिजे की, अशाप्रकारच्या घटना खपवून घेतली जाणार नाही. त्याची खबरदारी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. कारण अशा प्रकारच्या घटना ज्यावेळी घडत असतात त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असतो. त्या मंत्र्यांच्या अख्त्यारित ती बाब येते. त्यांच्याही प्रतिमेवर परिणाम होत असतो. त्या दृष्टीकोनातून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि इतरही सर्वांना सूचना दिल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
नरहरी झिरवळ कालच्या बैठकीला हजर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी संध्याकाळी सहा वाजता बैठक बोलावली होती. सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठीकाला नरहरी झिरवळ येतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कारण ते दोन ते तीन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण झिरवळ या बैठकीला हजर राहिले. या बैठीकत नेमकं काय घडलं? याबाबती सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अतिशय एकत्रितपणाने, एकसंघपणाने विधीमंडळ राष्ट्रवादी पक्ष, राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयमाने योग्य ती भूमिका घेत, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदावर संघटनेची धुरा ज्या पद्धतीने पाहत आहेत त्याबद्दलचा विश्वास व्यक्त करण्यात आला आणि त्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहावे आणि पक्ष संघटना मजबूत करावी, एवढंच कालच्या बैठकीचं सार होतं”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा