• Sat. Mar 7th, 2026

    Mumbai Water Metro: डिसेंबरपासून मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’, मंत्री नितेश राणेंचा गेमचेंजर प्लॅन; नरिमन पॉइंट, वर्सोवा… कसे असतील 8 मार्ग?

    Mumbai Water Metro: डिसेंबरपासून मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’, मंत्री नितेश राणेंचा गेमचेंजर प्लॅन; नरिमन पॉइंट, वर्सोवा… कसे असतील 8 मार्ग?

    Mumbai Water Metro Routes: मंत्री नीतेश राणेंनी समोवारी मुंबईत जल मेट्रो सुरु करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकरा यावरती काम करत असून लवकरच अहवाल सादर करण्यात येणार आहे.

    मंबई: मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता एक नवा प्लॅन तयार केला आहे. मुंबई शहरात आणि परिसरातून सुलभ आणि जलद प्रवासासाठी जल मेट्रो सुरु करण्यात येणार. महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी याबद्दल PTIशी महिती दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून मुंबईत जल मेट्रो टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    लवकरच अहवाल सादर करणार

    मुंबई महानगर प्रदेशामधील (MMR) जल मेट्रोसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) 28 फेब्रुवारीपर्यंत सादर केला जाणार आहे. यामध्ये मुंबईत बॅटरींच्या आधारे चालणाऱ्या बोटी सुरु करण्याची योजना आहे. या अहवाल सादर करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बैठक घेऊन जल मेट्रोचे मार्ग ठरवण्यात येतील. ‘जल मेट्रोची सुरुवात सर्वात आधी मुंबईमधून करून नंतर टप्प्या-टप्प्याने ती परिसरातील जिल्ह्यांमध्ये सुरु करण्याची आमची योजना आहे’, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिली.Maharashtra TimesDahisar-Mira-Bhayander Metro: 7 वर्षांनंतर मेट्रोचा पहिला टप्पा तयार, पण प्रवासी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; दहिसर-मिरा-भाईंदर मार्ग कधी सुरु होणार?

    सध्या राज्य सरकारने जल मेट्रोसाठी सहा ते आठ मार्ग निश्चित करणार आहेत. यानंतर मुंबईसह उपनगरांना विद्युत बोटींनी जोडणी मिळणार आहे. मुंबईतील वॉटर टॅक्सी प्रकल्पाचा हा एक भाग असणार आहे. या प्रकल्पासाठी 1200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत 2 मुख्य मार्ग निश्चित करण्यात येतील. या मार्गांवर सर्वप्रथम जल मेट्रो डिसेंबरपासून सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे.

    कसे असतील मार्ग?

    मुंबईत सर्वप्रथम नरिमन पॉइंट-वांद्रे-जुहू-वर्सोवा मार्गावर जल मेट्रो सुरु करण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. ‘पहिल्या टप्प्यांत आम्ही दोन मार्गांवर काम सुरु करणार आहोत,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाय, दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ कल्ब जेट्टी सुरु करण्याचं काम ही सुरु आहे. यानंतर ही जल मेट्रो मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळावर फक्त 40 मिनिटांत पोहचवू शकेल.

    Maharashtra TimesMumbai 3.0: तिसऱ्या मुंबईची अर्थभरणी! MMRDAच्या अर्थसंकल्पात 4000 कोटींची तरतूद, कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी?

    केरळमधील कोची जल मेट्रोच्या धर्तीवर मुंबईत जल मेट्रो सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात करणार आहेत. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यात मदत होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा