• Tue. Jun 16th, 2026

    Satara Crime: ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’, व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाचं नववीतल्या मुलीसोबत भयानक कृत्य; शाळेतच विद्यार्थिनी….

    Satara Crime: ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’, व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाचं नववीतल्या मुलीसोबत भयानक कृत्य; शाळेतच विद्यार्थिनी….

    साताऱ्यातील मलकापूरमध्ये एका शिक्षकाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नववीतील विद्यार्थिनीचा हात धरून तिला प्रपोज केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे या नराधम शिक्षकाचा खरा चेहरा समोर आला असून कराड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी साताऱ्यात शाळेतच विद्यार्थिनीला प्रपोज.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा : साताऱ्यातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. नुकताच प्रेमदिवस म्हणजे व्हॅलेंडाईन डे पार पडला. या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शाळेमधील एका शिक्षकाने संताप आणणारा प्रकार केला आहे. शिक्षकाने त्याच्या विद्यार्थीनीलाच प्रपोज केलं आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मलकापूरातल्या एका शाळेमध्ये हा प्रकार घडला आहेय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सध्या याप्रकरणाचा सखोल तपासही पोलिसांनी सुरु केला आहे. या शिक्षकाने मुलीच्या हाताला पकडले आणि तिला प्रपोज केलं, असं मुलीच्या पालकांनी शिक्षकाविरोधात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. कराड पोलिसांनी या शिक्षकाच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

    नेमकं काय घडलं?

    याप्रकरणी घडलं असं की, कराड तालुक्यातल्या मलकापूर शहरात व्हॅलेंटाईन डेला हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर सर्व जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. नववी या वर्गामध्ये शिकणारी विद्यार्थीनी आहे. तिला एका शिक्षकाने शाळेमध्य प्रपोज करत तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीची नोंद करण्यात आली आहे. कराड शहर पोलिसांत संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यत आला आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

    नववीच्या वर्गातील मुलीला प्रपोज

    पोलिसांनी यावेळी माहिती दिली की, मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलवले. त्यानंतर मुलीला भीती वाटत होती. या भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन वर्गाबाहेर पोहोचली जिथे हा नराधम शिक्षक वाट पाहत होता. यावेळी शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला एकटीला तिथे थांबण्यास सांगितले.

    Maharashtra TimesBeed Crime: ‘बेशुद्ध आहे’ म्हणत मुलाचं प्रेत बापाच्या हवाली केलं; पाच मित्रांनी जुन्या भांडणाचा सूड घेतला, छाती-पोटात….

    त्यानंतर हा शिक्षक या विद्यार्थिनीला म्हणाला की, मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन का असतेस तू? मी तुझ्यावर प्रेम करतो, असे तिच्या हातांना धरून बोलला.

    कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला

    दरम्यान, शिक्षकाच्या शाळेतल्या अशा कृतीने पीडित मुलगी प्रचंड घाबरुन गेली. तिची भंबेरी उडाली. तिने शिक्षकाचे हात झटकले आणि वर्गाच्या दिशेने धाव घेतली. संबंधित घडलेला प्रकार तिने आपल्या वर्ग मैत्रिणींना सांगितली. लगोलग सदरील प्रकार आई- वडिलांच्याही कानावर घातला.

    Maharashtra TimesNilesh Rane : ‘शिंदेंवरील टीका सहन केली जाणार नाही’, निलेश राणेंचा गणेश नाईकांना इशारा, महायुतीतला वाद टोकाला

    हे सर्व ऐकल्यावर विद्यार्थीनीच्या कुटुंबियांची तळपायाची आग मस्तकात गेली, पण त्यांनी पोलिस ठाण्यात जात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा