• Tue. Sep 8th, 2026
BMC मध्ये पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या किशोरी पेडणेकर; पदभार स्वीकारताच इरादे स्पष्ट केले

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजपनं शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली. ६५ जागा जिंकल्यानं दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्यानं विरोधी पक्षनेते पद आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे आलं. २ हजार सालापासून आतापर्यंत काँग्रेसकडे असणारं विरोधी पक्षनेते पद पहिल्यांदाच ठाकरेच्या शिवसेनेकडे आलंय. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. किशोरी पेडणेकर या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत. आधी महापौर आणि आता विरोधी पक्षनेते पद त्याच्या वाट्याला आलं आहे. अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली पण या पडझडीच्या काळात किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ढाल बनून उभ्या राहिल्या त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी किशोरी पेडणेकरांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली आहे. महापौर आणि विरोधी पक्षनेता या दोन्ही पदावर आता महिला असल्यानं मुंबई महापालिकेत आता महिलाराज दिसणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या ते पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed