• Tue. Mar 10th, 2026

    Tipu Sultan Controversy: ‘सपकाळांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस देणार’; हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजप आक्रमक, बड्या नेत्याचं वक्तव्य

    Tipu Sultan Controversy: ‘सपकाळांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस देणार’; हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजप आक्रमक, बड्या नेत्याचं वक्तव्य

    अहिल्यानगरात भाजप आक्रमक; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात जोरदार आंदोलन, ‘काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास….’

    भाजप नेत्याची हर्षवर्धन सपकाळांबाबत आक्रमक भूमिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून विविध ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. आंदोलकांनी सपकाळ यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या छायाचित्राचे एवढ्या मारो आंदोलन करत पायाखाली तुडवून निषेध नोंदविला.

    सपकाळ यांनी केले होते हे वक्तव्य

    सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यात “छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याचा विचार दिला, त्याच धर्तीवर टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. त्यामुळे शौर्याच्या दृष्टीने त्यांना समकक्ष पाहिले पाहिजे,” असे म्हटले होते. या विधानामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

    सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास भाजपकडून१० लाखांचे बक्षीस देऊ

    आंदोलनादरम्यान शहर भाजपचे महानगर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप यांनी केलेल्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली. सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस देऊ,असे त्यांनी जाहीर केल्याचे सांगण्यात आले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात असून कायदेशीर कारवाईची मागणीही होत आहे. सपकाळ यांच्या विधानाचा निषेध म्हणून राज्यातील अनेक शहरांमध्ये आंदोलने होत आहे.

    Maharashtra TimesLove Affair: महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणी विवाहित प्रियकराकडे गेली, पण तिथं भयंकर घटना; आधी संपवलं, नंतर बॉडी थेट…

    बुलढाण्यात भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव येथील उप महापौर यांच्या दलात लागलेल्या टिपू सुलतान यांच्या प्रतिमेवरून वक्तव्य करत, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर संपूर्ण राज्यभरात मोठा वाद निर्माण झालाय, याचेच पडसाद आता उमटताना दिसत आहेत, बुलढाण्यात भाजपाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचेहे दहन करण्यात आले.

    हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आपल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा