काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झालीय. नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. सपकाळांच्या निषेधाचे बॅनर घेऊन काँग्रेस कार्यालयाच्या प्रवेश द्वारावरच भाजपने ठिय्या केला. सपकाळांनी राजीनामा द्यावा नाहीतर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.