Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंडमध्ये शनिवारी घडलेल्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वीही मुंबईत मेट्रोच्या कामादरम्यान अशा घटना घडल्या आहेत.
मुलुंडमधील घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे मेट्रोच्या बांधकामात हलगर्जी होतेय का, असाही प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Mumbai Fraud: सात लाखांचे दुप्पट; स्वप्न ‘चौपट’! दामदुपटीचे आमिष दाखवून मालाडच्या व्यावसायिकाची फसवणूक, काय घडलं?
मुलुंडमधील दुर्घटना ही जानेवारी, २०२५पासूनची पाचवी दुर्घटना ठरली आहे. दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो-९ वर दोन वेळा आणि ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेवर एकवेळा दुर्घटना झाली आहे. या मालिकेत आता वडाळा-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची भर पडली आहे.
सेफ्टी ऑडिटची मागणी
महामुंबईत ३५० किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारण्यात येत आहे. शहरालगतच्या सर्वच उपनगरांमध्ये रस्ते खोदलेल्या स्थितीत आहे. अशा स्थितीत वाहतूक सुरू असताना, मेट्रो मार्गिकेचे काम अत्यंत काटेकोर आणि सुरक्षा यंत्रणेसह राबवणे गरजेचे आहे. सर्व प्रकल्पांचे नियमित सुरक्षा लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून एमएमआरडीएकडे केली जात आहे.
Vande Bharat: बाप रे बाप, ‘वंदे भारत’मध्ये साप! शौचालयात धामण सोडून पळून गेलेला माथेफिरु, भयंकर प्रकार CCTVमध्ये कैद
मुलुंडमधील घटनेमुळे सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
याआधीच्या घटना…
५ ऑगस्ट २०२५ : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ प्रकल्पात विठ्ठलनगर परिसरात बांधकाम सुरू असताना, एक लांब लोखंडी सळई अचानक कोसळली. ती सळई रस्त्यांवरून जात असलेल्या रिक्षाचे छत भेदून आरपार गेली. यात २० वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
२ सप्टेंबर २०२५ : दहिसर मिरा भाईंदर मेट्रो-९ प्रकल्पात भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरात लोखंडाचा जॅक कोसळला. यात जीवितहानी झालेली नाही. संबंधित कंत्राटदारावर निष्काळजीचा ठपका ठेवत १० लाख रुपयांचा दंड ठोठावला.
१७ नोव्हेंबर २०२५ : दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो-९ प्रकल्पात मिरा रोड येथील साईबा नगर परिसरात सुमारे ७० फूट उंचीवरून खाली पडल्याने बांधकाम पर्यवेक्षकाचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत सुरक्षा साधनांचा वापर आणि देखरेख यामध्ये त्रुटी असल्याचे दिसून आले. संबंधित कंत्राटदाराला ५० लाख रुपये आणि सल्लागार कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
३१ जानेवारी २०२५ : मेट्रो ४ मार्गिकेवरील चेंबूरमधील सुमन नगर परिसरात लोखंडी सळईंची जाळीलगतच्या रहिवासी संकूलात कोसळली यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
