Mumbai-Nashik Highway: ठाण्यातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल लवकरच सुरू होणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सुलभ होणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत खाडी पूल अरुंद असल्याने या पट्ट्यात दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत होता. मात्र या मार्गावरील खाडी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भिवंडी ते ठाणे या मार्गावरील वाहतूककोंडीचा विषय अनेक आमदारांनी उपस्थित केला. त्यावर एमएसआरडीसी तसेच वाहतूक विभागाकडून या महामार्गावर असलेले चार पूल लवकरच सेवेत दाखल होणार असल्याचे नमूद केले होते. त्यापैकी साकेत खाडी पुलावर शुक्रवारी भारमान चाचणी घेण्यात आली. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या पट्ट्यातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
Thane Coastal Road: ठाण्याच्या खाडीवर बनवणार कोस्टल रोड, आठ महिन्यांत मोठा टप्पा पूर्ण; थेट वाढवण बंदर, कर्नाटक पोहचवणार मार्ग, पाहा Video
31 डम्परची चाचणी
साकेत खाडी पुलावर तब्बल 31 डम्पर पूर्ण क्षमतेने भरून उभे करण्यात आले होते. 24 तासांसाठी पुलाच्या विविध भागात डम्पर चालवून आणि उभे करून भारमान चाचणी होणार आहे. यामुळे मुंबई आणि नाशिककडे जाणारी वाहने सुरळीत जाण्यास मदत होणार आहे. तसेच, नव्या पुलावरून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने व जुन्या पुलावरून नाशिक येथून मुंबईकडे दोन लेनमधून वाहने प्रवास करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
Mumbai Coastal Road: दोन दशकांहून जुनं नाना-नानी उद्यान ‘गायब’ होणार? 186 झाडं तोडून कोस्टल रोड बांधणार; उन्नत मार्गाचं काम सुरू
‘उन्नत’ची पायाभरणी
बांधकामाला सुरुवात होऊन अवघ्या आठ महिन्यांत ठाणे किनारा मार्ग रस्ता-क्रमांक-1 या प्रकल्पातील उन्नत मार्गाच्या पायाभरणी कामांपैकी 50टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. 13.45 किमी लांबीचा, सहा मार्गिकांचा हा ग्रीनफिल्ड मार्ग गायमुख येथे हा मार्ग प्रस्तावित गायमुख फाऊंटन हॉटेल येथील बोगद्याशी थेट जोडला जाईल. या प्रकल्पांमुळे घोडबंदर रोडची वाहतूक कमी होऊन ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
