Nana-Nani Trees Cut: मुंबईती सागरी किनारा मार्गाच्या उत्तरेकडील भाग वर्सोवामधील नाना-नानी पार्कमधून जाणार आहे. उन्नत मार्गासाठी 5-6 खांब उभारण्याचं काम सुरु असून त्यामुळे 186 झाडं बाधित होणार आहेत.
यापूर्वी वर्सोवा -भाईंदर सागरी किनारा मार्गासाठी संपूर्ण नाना-नानी उद्यान तोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, ऑगस्ट 2025मध्ये याला नागरिकांनी विरोध केल्यानंतर या योजनेत बदल करण्यात आले. यानुसार आता नाना-नानी उद्यानामधील 184 झाडं तोडली जाणार असून, त्यापैकी 164 झाडांचं पुनर्रोपन होणार आहे. या उद्यानात 5 ते 6 खांब उभारण्यात येणार असून यासाठी खोदकाम सध्या सुरु झालं आहे.
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामावेळी पिलरचा भाग रिक्षावर कोसळला, एकाचा मृत्यू, तिघे जखमी, भयंकर व्हिडिओ समोर
2001मध्ये सुरु झालं उद्यान
वर्सोवा येथील सेवेन बंगलोमधील नाना-नानी उद्यान 2001मध्ये सुरु झाले होते. तेव्हापासून हे उद्यान वर्सोवामधील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण बनलं आहे. अंधेरी ते वर्सोवमधील रहिवाशी उद्यानात सकाळी व सायंकाळी फेर फटका मारण्यास येत. मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात हे उद्यान मोकळ्या हवेचं ठिकाण बनलं होतं. वर्सोवा ने अंधेरीतील बानगुर नगरदरम्यान स्थित झाडं या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत.
या उद्यानाला दररोज 90 ते 100 नागरिक भेट देत असून, येथे तरुणांसाठी जिमसुद्धा आहे. या सुविधांमुळे सर्वांमध्ये हे उद्यान अतिशय लोकप्रिय आहे. या उद्यानावरून वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गावरील उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. यासाठी खांब बांधण्याचं काम सुरु केलं आहे.
Thane Coastal Road: ठाण्याच्या खाडीवर बनवणार कोस्टल रोड, आठ महिन्यांत मोठा टप्पा पूर्ण; थेट वाढवण बंदर, कर्नाटक पोहचवणार मार्ग, पाहा Video
एकून किती झाडं तोडणार?
वर्सोवामध्ये मुंबईतील कोस्टल रोडसाठी एकूण 1113 झाडं बाधित होणार आहेत. त्यापैकी 765 झाडांचं पुनर्रोपन करण्यात येणार आहे. संपूर्ण सागरी किनारा मार्गासाठी एकूण 1244 झाडं तोडली जाणार आहेत. दहिसरपर्यंत जोडला जाणारा या मार्गासाठी एकूण 20,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
