• Sat. Mar 14th, 2026

    मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला

    ByMH LIVE NEWS

    Feb 14, 2026
    मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला

     

    मुंबई 
    माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर राम मंदिर ते बोरिवलीदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    मध्य रेल्वे
    स्थानक : माटुंगा ते मुलुंड
    मार्ग : अप आणि डाऊन जलद
    वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५
    परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    हार्बर रेल्वे
    स्थानक : कुर्ला ते वाशी
    मार्ग : अप आणि डाऊन
    वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
    परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी-बेलापूर-पनवेलदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.

    पश्चिम रेल्वे
    स्थानक : राम मंदिर ते बोरिवली
    मार्ग : अप जलद आणि पाचवी मार्गिका
    वेळ : सकाळी १० ते दुपारी २
    परिणाम : ब्लॉकवेळेत अप जलद मार्गावरील लोकल फेऱ्या सहाव्या मार्गिकेवरून आणि पाचव्या मार्गिकेवरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. काही हार्बर लोकल फेऱ्या गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

    पश्चिम रेल्वेवर ‘लोकल’ दिलासा
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर अर्थात १९ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वेवर एक वातानुकूलित आणि तीन सामान्य अशा चार नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. ११ सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी वातानुकूलित लोकल धावणार आहेत. आगामी उन्हाळा लक्षात घेत पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी होती. त्यातच कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका पूर्ण झाल्याने नव्या लोकल फेऱ्यांसाठी मार्ग खुला झाला आहे.

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed