Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीचा सराव करताना एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं आई-वडिलांनी एकच आक्रोश केला.
आई-वडिलांचा आक्रोश
साल्शू येथील दीपक रामदास जाधव (वय 19) याचा रनिंगचा सराव करताना अचानक छाती त्रास झाल्यानं मृत्यू झाला. मुंबई येथे त्याची 13 फेब्रुवारी रोजी ग्राउंड चाचणी असल्याने तो सारशिव फाटा येथे मंगळूर नवघरे परिसरात पूर्वतयारीसाठी सराव करण्यास गेला होता. धावत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं या घटनेमुळे साल्शू गावासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. दीपक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
Virendra Sinha Pune : आय लव्ह यू रिया, कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू; शेवटचा मेसेज केला, पुण्यातील IT कर्मचाऱ्याने लोणावळ्यात आयुष्य संपवलं
खाकीचं स्वप्न अधुरंच राहिलं!
जिल्हा पोलीस दलाच्या 174 पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. परळी येथील दीपक भास्कर वाव्हळ (वय 26) या तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज बुधवारी पहाटे 5 वाजेपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. दुपारी 12:30च्या सुमारास 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर दीपकला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कडक ऊन आणि उकाड्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Pune Crime News : किरकोळ वादातून मित्रावर जीवघेणा हल्ला, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; पुण्यात खळबळ
नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढत असताना, दुपारी १२ वाजेपर्यंत शारीरिक चाचण्या घेतल्या जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातून आलेले उमेदवार अनेकदा उपाशीपोटी चाचणी देतात, त्यात उन्हामुळे त्यांच्या शरीरावर ताण येतो. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सकाळी ९ वाजेच्या आत सर्व मैदानी चाचण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
