• Fri. Mar 6th, 2026
    ठाण्यातील प्रदर्शनातून चोरी, स्टॉल मालकिणीचा संताप, CCTV फूटेज शेअर करत म्हणाल्या, सुशिक्षित दिसणारी महिला…

    Thane Exhibition Stall Theft : एक सुसंस्कृत, सुशिक्षित दिसणारी महिला शांतपणे तो सेट उचलते, काही क्षण थांबते आणि नंतर शांतपणे तो घेऊन निघून जाते, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : ठाणे क्लब येथे आयोजित प्रदर्शनातील स्टॉलवरुन एका तरुणीने हातोहात कुर्ता-दुपट्टा मटेरियल सेट लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टॉल धारक वंदना पवार यांनी इन्स्टाग्रामवर सीसीटीव्ही फूटेज शेअर करत सेट चोरणाऱ्या महिलेचा चेहरा दाखवला आहे. आर्थिक नुकसानासोबतच चोरी करणाऱ्या महिलेच्या मानसिकतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

    काय आहे इन्स्टाग्राम पोस्ट?

    मी वंदना पवार, एक नम्र विनंती करते. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत, ठाणे क्लबमध्ये आयोजित मेष प्रदर्शनात ‘तिशी क्रिएशन्स’ हा आमचा स्टॉल होता. ग्राहकांकडून आम्हाला प्रचंड आणि मनापासून प्रतिसाद, कौतुक, गप्पा आणि खूप प्रेम मिळाले. ते खरोखरच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते.आमचा स्टॉक तपासताना आम्हाला लक्षात आले की एक हँडक्राफ्टेड खण कुर्ती आणि दुपट्टा मटेरियल सेट गहाळ होता. आयोजकांच्या सहकार्याने आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. आम्हाला जे दिसले ते खूप अस्वस्थ करणारे होते. एक सुसंस्कृत, सुशिक्षित दिसणारी महिला शांतपणे तो सेट उचलते, काही क्षण थांबते… आणि नंतर शांतपणे तो घेऊन निघून जाते.
    Maharashtra TimesNashik News : मित्राची अनामिक ओढ, आईची नजर चुकवून नाशकातील तीन अल्पवयीन मैत्रिणी भेटीला, रात्री घराजवळ पेरुच्या बागेतच…

    महिलेच्या मानसिकतेवर प्रश्न

    त्या क्षणी, माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले… हे करताना एखाद्याच्या मनात काय चालले आहे? हस्तनिर्मित वस्तूला फक्त कापड म्हणून पाहिले जाते का? त्यामागील महिन्यांच्या मेहनतीचा, कारागिराच्या कौशल्याचा आणि एका लहान व्यवसायाच्या विश्वासाचा विचार केला जात नाही का?

    हे केवळ आर्थिक नुकसान नाहीये… हा विश्वासाला धक्का आहे. ज्या व्यक्तीने हे केले आहे, मी मनापासून आशा करते, की तुम्ही थोडा वेळ विचार कराल आणि तुमच्या कृत्याबाबत चिंतन कराल.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News : 54 दिवसांचं बाळ गेलं, माऊली 45 मिनिटं निष्प्राण लेकीकडे एकटक पाहत बसली, महाराष्ट्रातले नामवंत डॉक्टरही रडू लागले

    पाहा सीसीटीव्ही फूटेज:

    आमच्या सर्व ग्राहकांना, तुमच्या सततच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार. आम्ही मेष प्रदर्शनांच्या आयोजक मेधा दिवेकर आणि नीरज दिवेकर यांचेही मनापासून आभार मानतो, त्यांनी या घटनेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी त्वरित सहकार्य केल्याबद्दल. त्यांची प्रतिसाद आणि जबाबदारीची जाणीव खरोखरच प्रशंसनीय आहे. कला, प्रयत्न आणि सचोटीचा आदर करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा