Lonavala Husband Ends Life from Tiger Point : लोणावळा येथील टायगर पॉइंट येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीच्या वाढदिवशीच पतीने आपलं जीवन संपवलं आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून विरेंद्र आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू होते. 7 फेब्रुवारी शनिवारी रोजी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर 10 फेब्रुवारी मंगळवारी रोजी पत्नी हिंजवडीहून माहेरी निघून गेली. काल गुरुवारी रोजी पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीपासून विरेंद्र पत्नीला फोन करत होते; मात्र, तिने नंबर ब्लॉक केल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. पहाटे 5 ते 6च्या सुमारास त्याने पत्नीला टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओ मेल पाठवून आत्महत्या करत असल्याचं कळवलं.
Pune Railways: रेल्वे अपघातांची संख्या शून्य होणार, पुण्यात 250 किमी रेल्वे मार्गिकेवर ‘कवच’ प्रणाली; दौंड-मनमाड यशस्वी चाचण्या
पत्नीने मेसेज पाहून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विरेंद्र सिन्हा यांनी टायगर पॉइंट येथून सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उडी घेतली होती. अथक प्रयत्नानंतर विरेंद्र सिन्हा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. स्थानिक बचाव पथक शिवदुर्ग लोणावळा मित्र यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. विरेंद्र यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. पत्नीच्या वाढदिवशीच पतीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यातही याच परिसरात एका उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या केली होती. त्यामुळे टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट अशा धोकादायक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणे आणि स्थानिक नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे बोललं जात आहे.
Akola News : घरात डिझेलचा साठा, आग लागल्याने भीषण स्फोट, चिमुकल्या भाचीसह मामी होरपळली; कुटुंबियांचा आक्रोश
सेल्फी घेण्याचा मोह जीवावर बेतला
निसर्गरम्य खंडाळा टेकडीवरील सनसेट पाहण्याचा आणि सेल्फी काढण्याचा मोह एका 26 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. प्रज्वल वसंत गिरी (वय 26) हा सुमारे 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल गिरी हा आपल्या नातेवाईकांसह लोणावळा येथे फिरण्यासाठी आला होता. तेथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. हॉटेलमध्ये प्रवेशासाठी काही वेळ लागणार असल्याने सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास सर्वजण खंडाळा टेकडीवर सनसेट पाहण्यासाठी गेले होते, तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली.
