Western Expressway Traffic: मुंबई महापालिकेने माहीम ते वांद्रे पूर्व असा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करेल. मात्र, तीन वर्षांपासून हा पूल कागदावरच आहे. २०२२ पासून निविदा काढल्या जात आहेत, पण प्रतिसाद मिळत नाही.
दादर, खार, सांताकृझपर्यंत परिणाम
पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडीचा मोठा सामना वाहनचालकांना करावा लागतो. यामध्ये वांद्रे पूर्व मिठी खाडीपासून माहीमच्या सेनापती बापट मार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्याचा परिणाम दादरपर्यंत आणि खार, सांताक्रूझपर्यंत होतो. ही कोंडी फोडण्यासाठी सेनापती बापट मार्गावरील मच्छिमार कॉलनी ते वांद्रे पूर्वपर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. उड्डाणपूल वांद्रे पूर्व भागातील कलानगर उड्डाणपुलाच्या जवळून सुरू होईल आणि मिठी खाडीवरून सेनापती बापट मार्गाला जोडला जाईल. त्यामुळे उपनगर ते दक्षिण मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
Konkan Railway: लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल
सन २०२२मध्येही या उड्डाणपुलासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्याने निविदा प्रक्रिया मागे घेण्यात आली. त्यानंतर जुलै २०२३मध्येही निविदा काढली. मात्र या निविदेला प्रतिसादही मिळाला नाही. शिवाय निविदेची मुदतही संपली. त्यामुळे महापालिका पूल विभागाने पुन्हा निविदा काढली आहे.
किती कोटींचा खर्च?
या उड्डाणपुलासाठी २२० कोटी १७ लाख ४० हजार रुपये खर्च येणार आहे. मिठी खाडीवरून पूल जाणार असल्याने सीआरझेड, वन विभागाची परवानगीही लागणार आहे. ही परवानगी घेण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणारा हा पूल फायदेशीर ठरणार आहे.
Mumbai Traffic: मुंबईकरांनो, ‘या’ महत्त्वाच्या पुलावर जड वाहनांना 3 महिने ‘नो एन्ट्री’; आता पर्यायी मार्ग कोणते? पाहा नवी नियमावली
एक किमी लांबीचा पूल
साधारण एक ते सव्वा किलोमीटर लांबीचा हा पूल असेल. सध्या या पट्ट्यात चुनाभट्टी ते बीकेसी आणि जुना कलानगर उड्डाणपूलही आहे. त्यातच माहीम ते वांद्रे पूर्व जवळही उड्डाणपूल उभारणी होणार असल्याने या पट्ट्यातील वाहतूककोंडी भविष्यात कमी होण्यास मदत मिळणार आहे.
