• Mon. Sep 21st, 2026
Maharashtra Live News 13th February 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Politics : ‘आम्हा कोणाकोणाला एक-एक कोटी मिळाले? संदीप देशपांडे नावं सांगा, राजीनामा टाकतो’; ठाकरेसेनेच्या नेत्याचं ओपन चॅलेंज

‘आम्हाला कुणी पैसे दिले आणि कुणी घेतले त्यांची नावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर करावे. आम्हाला कुणी पैसे देऊन विकत घेतले असेल, तर माझ्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील’ असे जाहीर आव्हान ठाकरेसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी गुरुवारी दिले. चंद्रपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहाय्याने भारतीय जनता पक्षाचा महापौर बसला, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस मात्र अधिक जागा मिळवूनही सत्तेपासून वंचित राहिली. त्या पार्श्वभूमीवर ‘चंद्रपूर महापालिकेत शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांना एक-एक कोटी रुपये देण्यात आले. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत’ असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना गिऱ्हे यांनी हे आव्हान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed