परभणीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उज्जैनला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, परभणी : देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जिंतूर चारठाणा रोडवरील अकोली पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना १२ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चौघेही परभणी जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्याभर हळहळ व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील 5 भाविक उज्जैन येथील धार्मिक तीर्थस्थळी देवदर्शनासाठी गंगाखेडहून जिंतूरमार्गे संभाजीनगरकडे जात होते. जिंतूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील अकोली पुलाजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मुद्दसीर आणि रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी तपासणी केल्यानंतर बालाजी आश्रोबा औटी (वय २८ वर्षे), बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय ३० वर्ष), कृष्णा बालाजी गुट्टे (वय २८), रोहन संजय राठोर (वय २७ वर्षे) या चौघांना मृत घोषित केले. तर गोपाळ गणेश रोकडे (वय २८ वर्षे) हा अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बिट जमादार दत्तात्रेय गुंगाणे, मेजर थोरवे आणि पोलीस वाहनचालक पैठणे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने गंगाखेड आणि जिंतूर परिसरात शोककळा पसरली आहे. जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रमोद पारवे, डॉ. मोहिनी हरकळ, रुग्ण कक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन केला. बिट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विजय जाधव करीत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा