• Sat. Mar 7th, 2026

    Kolhapur Crime : ‘बाजाराला जाते’ सांगून तीन आठवड्यांपासून बेपत्ता, आता ओढ्यात आढळली छिन्नविछिन्न बॉडी; कोल्हापूरमध्ये महिलेसोबत काय घडलं?

    Kolhapur Crime : ‘बाजाराला जाते’ सांगून तीन आठवड्यांपासून बेपत्ता, आता ओढ्यात आढळली छिन्नविछिन्न बॉडी; कोल्हापूरमध्ये महिलेसोबत काय घडलं?

    Kolhapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. यातच आता कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची हत्या करुन मृतदेह ओढ्यात फेकलेला आढळलेला आहे.

    गडहिंग्लज ओढ्यात शिर नसलेला मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका महिलेचा मृतदेह ओढ्यात सापडल्याने कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यासह कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील सुनीता संजय केसरकर (वय 40) यांचा शिर नसलेला मृतदेह महागाव ओढ्यात सापडल्याने हत्येचा संशय वाढला आहे. तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या सुनीता यांचा मृतदेह काल बुधवारी 24 दिवसांनी आढळला असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तीव्र तपास सुरू केला आहे. या अमानुष घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे.

    ‘बाजाराला जाते…’

    18 जानेवारी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता ‘बाजाराला जाते’, असं सांगून सुनीता घरातून बाहेर निघाल्या होत्या. ऊसतोडणी मजूर संजय केसरकर यांच्या पत्नी असलेल्या सुनीता बांधकाम मजुरी करत होत्या. रात्री त्या पुन्हा न परतल्याने मुलगा लक्ष्मीकांतने गडहिंग्लज पोलिसांत बेपत्ता तक्रार नोंदवली. नातेवाईकांनी सुनीता यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची चिंता वाढली होती.
    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार; घराच्या ड्रेनेज लाइनच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीने तब्बल ७ कोटी लुटले, नेमकं काय घडलं?

    भयानक अवस्थेत आढळला मृतदेह

    यातच महागाव-मासेवाडी रस्त्यावरील घंटीचा झरा या ओढ्यात शिर नसलेला मृतदेह वाहून आल्याचं ग्रामस्थांना दिसलं. या मृतदेहाचे शिर नव्हते, तसेच उजव्या पायाची हाडे देखील दिसू लागली होती, असे ते भीतीदायक दृश्य होते. महागाव पोलीस पाटील प्रदीप कांबळे यांच्या सांगण्यावरुन गडहिंग्लज पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. या घटनेची नोंद झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक, महिला पोलिस कॉन्स्टेबल अंजली पाटील आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी केली. आजूबाजूचा परिसर आणि मृतदेहाची चप्पल, साडी, बांगड्या आणि हातात बांधलेला काळा दोरा यावरून तो मृतदेह सुनीता यांचा असल्याची ओळख पटली.

    फॉरेन्सिक अहवालानंतरच प्रकरणाचा छडा

    मृतदेहाजवळ मोबाईल न सापडल्याने सीडीआर, शेवटचे लोकेशन आणि कॉल रेकॉर्डचा तपास सुरू आहे. शिर वेगळे कसे झाले? हत्या कशामुळे केली? हे कोडे सोडवण्यासाठी फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. संशयितांची चौकशी चालू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ओढ्यातून मृतदेह आल्यानं गुन्हेगारीचा कटकारस्थान असल्याचं सूचित होत आहे.
    Maharashtra TimesAmravati Crime : ‘तुझी मुलांसोबत लफडी’; अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यात अडवलं, धमकावून सामूहिक अत्याचार; डॉक्टरकडे गेल्यावर…

    पोलिसांसमोर मोठं आव्हान

    मृतदेहाची अवस्था पाहता पोलिसांचा संशय बळावला आहे. तर ग्रामस्थांमध्येही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मृतदेहाचे शिर शोधणे, हत्यार ओळखणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. गडहिंग्लज पोलीस प्रकरणाला प्राधान्य देत असून, लवकर दोषींना न्यायालयात उभे करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.
    Maharashtra TimesMumbai Local: मुंबई लोकलमधून तरुण थेट पाण्यात पडला, मध्यरात्री सुटकेचा थरार; VIDEO आला समोर

    सुनीता यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे असा मोठा परिवार आहे. या मजूर कुटुंबावर आलेल्या दु:खाने कुटुंबीय आणि नातेवाईक पूर्णपणे खचून गेले आहेत. परंतु शिर नसलेल्या मृतदेहाने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळेच पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा होत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा