• Mon. Mar 9th, 2026

    29 महापालिकांमध्ये कोणाची सत्ता?

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    29 महापालिकांमध्ये कोणाची सत्ता?
    मुंबई
    जवळपास महिन्याभरापूर्वी राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले. बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना चांगलं यश मिळालं. विरोधकांची अवस्था अतिशय वाईट झाली. महिन्याभरानंतर बहुतांश महापालिकांमधील चित्र स्पष्ट झालं आहे. जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये महापौर, उपमहापौर निवडले गेले आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे-१. मुंबई- महायुती- रितू तावडे (भाजप), संजय घाडी (शिंदेसेना)
    २. ठाणे- महायुती- शर्मिला पिंपळोलकर (शिंदेसेना), कृष्णा पाटील (भाजप)
    ३. कल्याण डोंबिवली- महायुती- हर्षाली चौधरी (शिंदेसेना), राहुल दामले (भाजप)
    ४. मिरा-भाईंदर- भाजप- डिंपल मेहता (भाजप), ध्रुवकिशोर पाटील (भाजप)
    ५. वसई विरार- बविआ- अजीव पाटील (बविआ), मार्शल लोपिस (बविआ)
    ६. नवी मुंबई- भाजप- सुजाता पाटील (भाजप), दशरथ भगत (भाजप)
    ७. भिवंडी- काँग्रेसला सर्वाधिक जागा, पण सत्ता स्थापनेचा पेच
    ८. उल्हासनगर- महायुती- अश्विनी निकम (शिंदेसेना), अमर लुंड (भाजप)
    ९. पनवेल- भाजप- नितीन पाटील (भाजप), प्रमिला पाटील (भाजप)
    १०. पुणे- भाजप- मंजुषा नागपुरे (भाजप), परशुराम वाडेक (भाजप)
    ११. पिंपरी चिंचवड- भाजप- रवी लांडगे (भाजप), शर्मिला बाबर (भाजप)
    १२. नागपूर- भाजप- नीता ठाकरे (भाजप), लीला हाथीबेड (भाजप)
    १३. नाशिक- महायुती- हिमगौरी आडके (भाजप), विलास शिंदे (शिंदेसेना)
    १४. छत्रपती संभाजीनगर- महायुती- समीर राजूरकर (भाजप), राजेंद्र जंजाळ (शिंदेसेना)
    १५. नांदेड- भाजप- कविता मुळे (भाजप), दीपकसिंह रावत (भाजप)
    १६. अमरावती- भाजप- श्रीचंद तेजवानी (भाजप)
    १७. परभणी- शिवसेना उबाठाला सर्वाधिक जागा, पण सत्ता स्थापनेचा पेच कायम
    १८. मालेगाव- इस्लाम पक्ष- सप- नसरीन बानो खालिद (इस्लाम पक्ष), शान -ए -हिंद (सप)
    १९. सोलापूर- भाजप- विनायक कोंड्याल (भाजप)
    २०. धुळे- भाजप- मायादेवी परदेशी (भाजप), ज्योत्स्ना पाटील (भाजप)
    २१. सांगली- महायुती- धीरज सूर्यवंशी (भाजप), गजानन मगदूम (राष्ट्रवादी काँग्रेस अप)
    २२. कोल्हापूर- महायुती- रुपाराणी निकम (भाजप), अक्षय जिरग (जनसुराज्य)
    २३. इचलकरंजी- भाजप- उदय धातुंडे (भाजप), अनिल कुमार (भाजप)
    २४. जळगाव- महायुती- दीपमाला काळे (भाजप), मनोज चौधरी (शिंदेसेना)
    २५. अहिल्यानगर- महायुती- ज्योती गाडे (राष्ट्रवादी अप), धनंजय जाधव (भाजप)
    २६. अकोला- भाजप- शारदा खेडकर (भाजप), अमोल गोगे (भाजप)
    २७. लातूर- काँग्रेस- जयश्री सोनकांबळे (काँग्रेस), स्नेहल उटगे (काँग्रेस)
    २८. जालना- भाजप- वंदना मगरे (भाजप), राजेश राऊत (भाजप)
    २९. चंद्रपूर- भाजप-शिवसेना उबाठा संगीता खांडेकर (भाजप), प्रशांत दानव (शिवसेना उबाठा)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *