• Thu. Jun 18th, 2026

    परळी वैजनाथ येथील महा पशुधन एक्स्पोच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    परळी वैजनाथ येथील महा पशुधन एक्स्पोच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद

    मुंबई, दि. १०: पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीयस्तरावरील महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाले.

    मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन यांच्यासह विविध विभागचे मंत्री तसेच सचिव उपस्थित होते.

    पशुसंवर्धन विभाग व पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने बीडमधील परळी वैजनाथ येथील ओपळे मैदानात हे महा पशुधन एक्स्पो होणार आहे. या प्रदर्शनात देशभरातील विविध जातीवंत पशुधन पाहण्यास मिळणार आहेत. त्याशिवाय पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध पशुसंवर्धन विषयक योजनांचे सादरीकरण, पशुपालन विषयक प्रात्यक्षिके आदींसह सुमारे विविध विषयांवरील 300 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या 45 हून अधिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

    या प्रदर्शनात सुमारे हजाराहून अधिक विविध पशुपालक आपल्या पशुंसह सहभागी होणार आहेत. तसेच पशुपालन विषयक क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक व विद्यार्थीही या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

    ०००

    नंदकुमार वाघमारे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed