• Sun. Mar 8th, 2026

    Vikhroli Pink Blossom: विक्रोळीतील ‘ती’ गुलाबी फुलं पुन्हा दिसणार नाहीत? मुंबईतील लोकप्रिय ‘पिंक ब्लॉसम’चं यंदा शेवटचं वर्ष; नेमकं कारण काय?

    Vikhroli Pink Blossom: विक्रोळीतील ‘ती’ गुलाबी फुलं पुन्हा दिसणार नाहीत? मुंबईतील लोकप्रिय ‘पिंक ब्लॉसम’चं यंदा शेवटचं वर्ष; नेमकं कारण काय?

    Vikhroli Cherry Blossom: दरवर्षी विक्रोळीतील पूर्व दृतगीत मार्गावर फुलणाऱ्या पिंक ट्रम्पेट झाडांची नागरिका आतुर्तेनं वाट पाहत असतात. फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. पण एका कारणामुळे ही झाडं तोडणार असल्याची शक्यता आहे.

    मुंबई: मुंबईत दरवर्षी फेब्रुवारीमध्ये विक्रोळीत पिंक ट्रम्पेट ( Vikhroli Cherry Blossom ) झाडांना बहर येते. सोशल मिडीयावर ही फुलं भलतीच व्हायरल होत असून, प्रत्येक वेळी त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. परंतु, यंदा या पिंक ट्रम्पेट झाडांवर शेवटची फुलं बहरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमध्ये असलेला हा निसर्गरम्य स्पॉट लवकरच जाण्याची शक्यता आहे.

    कशामुळे झाडं तोडणार?

    हे Vikhroli Pink Blossom विक्रोळी रेल्वे रुळांच्या बाजूला पूर्व दृतगती मार्गालगतच आहे. हा मार्ग विक्रोळी ते ठाणे जोडतो. या मार्गाचं विस्तारिकरणामुळे रस्त्याच्या बाजूची एकूण 706 झाडे बाधित होणार आहेत. यामधील 315हून अधिक झाडं तोडली जाणार आहेत. उर्वरित झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. यामध्ये या पिंक ट्रम्पेट झाडांचाही समावेश आहे. वर्षभर मुंबईकर या फुलांची आतुर्तेनं वाट पाहत असतात, पण यंदा हे त्यांचं शेवटचं वर्ष असेल का हा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे.Maharashtra TimesMaharashtra Weather: राज्यात थंडी गायब, आता पडणार कडक ऊन; येत्या दोन दिवसांत मुंबई, पुण्यातील तापमानाचा पारा चढणार

    घाटकोपर-ठाणे उन्नत मार्ग

    MMRDA ने घाटकोपरमधील छेडा नगर ते ठाण्यातील आनंद नगरपर्यंत 12.95 किमी लांब उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. यामुळे मुंबई ते ठाणे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. परंतु, याच प्रकल्पाचा भाग म्हणून दृतगती मार्गाचा विस्तार होणार आहे आणि यामध्ये 125 पिंक ट्रम्पेट झाडं तोडली जाऊ शकतात. यामुळे एका पर्यावरण प्रेमीने हा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीएमसीकडून या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. येत्या 27 फेब्रुवारीला या खटल्यासंदर्भात सुनावणी होणार आहे. या अहवालात नेमकी किती वृक्ष तोडणार, उपलब्ध असलेले पर्याय या सर्वाबद्दल माहिती मागवली आहे.

    Maharashtra TimesVande Metro: लोकल प्रवास वंदे भारत इतका वेगवान! मुंबईत 238 ‘वंदे मेट्रो’ गाड्या, बंद दरवाजे, 12-18 डबे; कधी-किती भाडं?

    महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या तोडलेल्या झाडांचं पुनर्रोपन केलं जाणार आहे. मुंबई मिररला एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भांडूप कॉम्प्लेक्स नागरी जलशुद्धीकरण केंद्रात वृक्षारोपण केलं जाणार आहे. तसेच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवरही झाडे लावली जातील. अशे एकूण 4000हून अधिक झाडं लावण्यात येणार आहेत. शिवाय बाधित झाडांचं स्थलांतर देखील केलं जाणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा