Central Railway: मुंबईकरांसाठी पावसाळ्या रेल्वे रुळांवर पाणी भरून रेल्वे वाहतूक ठप्प होणे ही नेहमीची समस्या झाली आहे. या साठी ठाणे रेल्वे स्थानकावर मायक्रोटनेलिंगचं काम सुरू केलं होतं. आता ते पूर्ण झालं असून, प्रवाशांना कसा फायदा होईल, ते पाहा
ठाणे शहराच्या पश्चिमेकडून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात फलाट क्रमांक एक, दोन आणि तीनवर साचते. रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने सीएसएमटीसह कल्याण दिशेकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूकीवर परिणाम होतो. पश्चिमेकडून येणाऱ्या पाण्याचा निचरा पूर्वेकडे वेगाने होण्यासाठी फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक दहाच्या रुळांखालून मायक्रोटनेल उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला.
Chembur Metro Station: पूर्व मुंबईकरांना मिळणार नवं मेट्रो स्थानक, एप्रिलमध्ये होणार सुरू; अंधेरी-मानखुर्द जोडणारी मार्गिका कशी असेल?
आगामी पावसाळ्यात लोकल (Mumbai Local) अबाधित राहून प्रवाशांच्या प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी पावसाळी पूर्वतयारीचा भाग म्हणून ठाणे स्थानकात मायक्रोटनेल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. उच्च अचूकता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी एमबीटीएम (मायक्रोटनेल बोरिंग मशिन) अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने होऊन लोकलसेवा अखंडित राहण्यास मदत मिळणार आहे, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्रेंचलेस मायक्रोटनेलिंगचा वापर
ठाणे रेल्वे स्थानकातील १० फलाटांवरून मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, ट्रान्सहार्बरसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांची हाताळणी होते. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी आणि रेल्वेगाड्यांची वर्दळ सातत्याने असते. रुळांवर उतरून काम करणे शक्य नव्हते. यामुळे प्रवासी वाहतुकीला बाधा न आणता हे काम रिमोट कंट्रोलद्वारे चालविण्यात येणाऱ्या बोरिंग मशिनच्या सहाय्याने केले जाते. ही पूर्णपणे ट्रेंचलेस (खोदकाम न करता) बांधकाम पद्धत आहे.
Thane Railway Station: प्रचंड रेटारेटीत दररोज जीवघेणा प्रवास, कल्याण-कर्जत मार्गावर नव्या प्रकल्पांचा फक्त गाजावाजा; ठाणेकरांना दिलासा कधी?
लेझर यंत्रणेचा वापर
या भागातील भूस्तर कठीण चिकणमाती आणि तुटक खडकांचा होता. त्यामुळे हे काम किंबहुना पाइप जोडणी आव्हानात्मक होती. लेझर यंत्रणा, हायड्रोलिक जॅक आणि अन्य आधुनिक यंत्रसामुग्रीच्या मदतीने पाइपची अचूक जोडणी करण्यात आली.
Metro Line 14: कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोला चालना, 2026 मध्येच MMRDA करणार काम सुरू; ऐरोली, शीळफाटा, अंबरनाथ… कुठे असतील स्थानके?
४५ दिवसांत मोहीम फत्ते
मायक्रोटनेलच्या ठाण्यातील कामाला १ डिसेंबर २०२४ रोजी रुवात झाली होती आणि अवघ्या १५ जानेवारी २०२५ रोजी काम पूर्ण झाले. नियोजनबद्ध कामांमुळे दीड महिन्यात मोहीम फत्ते करण्यात आली. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी पाणी साचण्याची समस्या आता कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा दावा मध्य रेल्वे अधिकाऱ्यांचा आहे.
