• Sat. Jun 13th, 2026
    Pune Zp Election Result: ‘जिल्हा कोणाच्या मागे आहे बघ?’ अजित पवारांच्या ‘त्या’ शब्दांची आज पुन्हा आठवण

    विमान अपघातात अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने कोणतीही जाहीर सभा न घेता, केवळ पत्रक वाटप करून प्रचार केला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजित दराडे, पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युंनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. पुणे जिल्ह्यातील 73 जिल्हा परिषद गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 72 जागांवर नुवडणूक लढवली होती. त्यापैकी 51 ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर आपली सत्ता राखाली आहे.

    राज्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत देखील पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली होती. 21 डिसेंबरला निकाल लागला त्यावेळेस अजित पवार महानगर पालिका निवडणुकांची तयारी करत होते. पुण्यातील बारामती हॉस्टेल याठिकाणी अजित पवारांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. निकाल लागल्यानंतर अजित पवारांना या निकालाविषयी प्रतिक्रिया विचारली गेली होती त्यावेळी अजित पवारांनी खास आपल्या शैलीत ‘जिल्हा कोणाच्या मागे उभा आहे बघ’ अशी प्रतिक्रिया देत पुढील बैठका सुरु केल्या होत्या.

    आज जिल्हा परिषदचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांच्या त्याच प्ररीक्रियेची आठवण ताजी झाली आहे, कारण 51 जागा जिंकत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्यावर एक हाती झेंडा फडकवला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जुन्नरमध्ये 7 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 4 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

    Maharashtra TimesMawal ZP Election Result : ‘दादांची उणीव भासतेय…’; मावळच्या ‘क्लीन स्वीप’नंतर आमदार सुनील शेळके भावुक, विरोधकांवर प्रहार

    आंबेगावमध्ये 5 पैकी 3, शिरूरमध्ये 7 पैकी 4, खेडमध्ये 8 पैकी 3, मावळमध्ये 5 पैकी 5, मुळशीमध्ये 3 पैकी 2, हवेलीमध्ये 6 पैकी 4, दौंडमध्ये 7 पैकी 6, पुरंदरमध्ये 4 पैकी 2, राजगडमध्ये 2 पैकी 2, भोरमध्ये 4 पैकी 2, बारामतीमध्ये 6 पैकी 6 आणि इंदापूरमध्ये देखील 8 पैकी 8 जागा जिंकत पुणे झेडपीवर झेंडा फडकवला आहे.

    त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात पुणे जिल्ह्यातील मतदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कौल दिला आहे. 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराला येत असताना एका विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीने एकही सभा किंवा जाहीर कार्यक्रम घेतला नव्हता. फक्त घरोघरी जाऊन पत्रक देत संपूर्ण प्रचार केला होता.

    त्यानंतर देखील राष्ट्रवादीने जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अजित पवारांच्या जिल्हा कोणाच्या मागे आहे बघ? या वक्तव्याची आठवण झाली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा