• Wed. Mar 11th, 2026

    वर्ल्ड कप विनर कॅप्टनच्या ऑटोग्राफसाठी छोट्यांची गर्दी

    ByMH LIVE NEWS

    Feb 9, 2026
    वर्ल्ड कप विनर कॅप्टनच्या ऑटोग्राफसाठी छोट्यांची गर्दी

    भारताने मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करुन अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली.  आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026  विजयानंतर भारतीय संघाचं रविवारी संध्याकाळी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेस क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते. खेळाडूंनी चाहत्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला आणि देशवासियांसह वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा केला. त्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी रवाना झाले. भारताचा कर्णधार विरारकर आयुष म्हात्रे आपल्या घरी पोहचला. त्यानंतर अवघ्या काही वेळात आयुषची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

    आयुषने वर्ल्ड कप जिंकून देत भारताचं नावं उंचावलं. तसेच आयुषमुळेच विरारचं नाव जागतिक पातळीवर पोहचलं. या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला पाहण्यासाठी वसई-विरारकरांनी एकच गर्दी केली. आयुषची एका चारचाकी गाडीतून ही विजयी मिरवणूक काढण्यात आली.

    ये आयुष दादा, छोट्या चाहत्यांची उपस्थिती

    https://platform.twitter.com/embed/Tweet.html?creatorScreenName=tv9marathi&dnt=false&embedId=twitter-widget-0&features=eyJ0ZndfdGltZWxpbmVfbGlzdCI6eyJidWNrZXQiOltdLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X2ZvbGxvd2VyX2NvdW50X3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9iYWNrZW5kIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19yZWZzcmNfc2Vzc2lvbiI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZm9zbnJfc29mdF9pbnRlcnZlbnRpb25zX2VuYWJsZWQiOnsiYnVja2V0Ijoib24iLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X21peGVkX21lZGlhXzE1ODk3Ijp7ImJ1Y2tldCI6InRyZWF0bWVudCIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZXhwZXJpbWVudHNfY29va2llX2V4cGlyYXRpb24iOnsiYnVja2V0IjoxMjA5NjAwLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X3Nob3dfYmlyZHdhdGNoX3Bpdm90c19lbmFibGVkIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19kdXBsaWNhdGVfc2NyaWJlc190b19zZXR0aW5ncyI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdXNlX3Byb2ZpbGVfaW1hZ2Vfc2hhcGVfZW5hYmxlZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdmlkZW9faGxzX2R5bmFtaWNfbWFuaWZlc3RzXzE1MDgyIjp7ImJ1Y2tldCI6InRydWVfYml0cmF0ZSIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfbGVnYWN5X3RpbWVsaW5lX3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9mcm9udGVuZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9fQ%3D%3D&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=2020538171734552938&lang=mr&origin=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fgrand-welcome-and-victory-parade-of-under-19-team-india-world-cup-winner-captain-ayush-mhatre-at-virar-by-local-people-1601678.html&sessionId=a8b5571c2b518f6e9b89f60795ad1fed9ec6327f&siteScreenName=tv9marathi&theme=light&widgetsVersion=2615f7e52b7e0%3A1702314776716&width=550px

    आयुषचं या विजयी मिरवणुकीचं ठिकठिकाणी स्थानिकांकडून स्वागत करण्यात आलं. आयुषचा हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला. आयुषला पाहण्यासाठी त्याच्या छोट्या चाहत्यांनीही एकच गर्दी केली होती. “ये आयुष दादा”, अशी एका छोट्या चाहत्याने कॅप्टनला हाक मारली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

    आयुषची अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी

    दरम्यान आयुषने या अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत नेतृत्वासह बॅटिंग आणि बॉलिंगनेही योगदान दिलं. आयुषने 7 सामन्यांमधील 7 डावांत 30.57 च्या सरासरीने आणि 113.23 च्या स्ट्राईक रेटने एकूण 214 धावा केल्या.  आयुष म्हात्रे याने या 7 डावांदरम्यान एकूण  14 षटकार आणि 20 चौकार लगावले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed