उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडी गणित जुळवणार? राऊतांनी स्पष्ट सांगितलं
राज्यात एकूण ६६.२८ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक मतदानाची नोंद परभणीमध्ये झाली. परभणी येथील ९ पंचायत समित्यांसाठी एकूण ७४.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने रविवारी दिली. तर, पुण्यात ६८.३५ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील एकूण १ कोटी ४१ लाख ९० हजार २११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रायगड येथे ६९.९१ टक्के मतदानाची नोंद झाली. रत्नागिरी ५५.७९ टक्के, सिंधुदुर्ग ६१.९८ टक्के, पुणे ६८.३५ टक्के, सातारा ६७.८० टक्के, सांगली ६९.७६ टक्के, सोलापूर ६५.९० टक्के, कोल्हापूर ७४.४५ टक्के, छत्रपती संभाजीनगर ७२.६९ टक्के, परभणी ७४.८९ टक्के, धाराशिव ६५.२२ टक्के आणि लातूर ६३.७९ टक्के याप्रमाणे मतदान झाले.
तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. यामध्ये कोल्हापूर ७४.४५ टक्के, छत्रपती संभाजीनगर ७२.६९ टक्के आणि परभणी ७४.८९ टक्के या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वांत कमी म्हणजे, ५५.७९ टक्के मतदान रत्नागिरी जिल्ह्यात झाले.