• Wed. Jul 1st, 2026

    लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा! फडणवीस सरकारकडून महत्त्वाची घोषणा

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा! फडणवीस सरकारकडून महत्त्वाची घोषणा
    मुंबई
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शासनानं अशा महिलांना दुरुस्तीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. याबद्दलची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
    ‘e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे,’ असं अदिती तटकरे यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

    ‘ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती,’ असं आवाहन अदिती तटकरेंनी केलं आहे.

    e-KYC प्रक्रिया करताना कोणतीही चूक झाली असल्यास सर्व लाडक्या बहि‍णींनी मुदतीपूर्वी आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी, असं आवाहन महिला आणि बालकल्याण विभागाकडून करण्यात आलं आहे. योग्य माहिती अपडेट झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्र महिलांना योजनेच्य अंतर्गत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

    ई-केवायसीची गरज का?
    योजनेच्या खऱ्या आणि बनावट लाभार्थी यांच्यातला फरक ओळखण्यासाठी ई-केवायसी गरजेची आहे. योजनेचा लाभ काही बनावट लाभार्थी घेत असल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली. केवायसी अपडेट केल्यावर महिलांना दरवर्षी त्यांची कागदपत्रं अपडेट करावी लागणार आहेत. त्यानंतरच त्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed