• Mon. Jun 29th, 2026

    दादांच्या विमानातून कोणाची उडी? प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक दावा, सरपंचांनी सगळं सांगितलं

    ByMH LIVE NEWS

    Feb 4, 2026
    दादांच्या विमानातून कोणाची उडी? प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक दावा, सरपंचांनी सगळं सांगितलं

    पुणे

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आठवडा होऊन गेला आहे. २८ जानेवारीच्या सकाळी अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवारांचं विमान कोसळलं. या अपघातात विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी बारामतीला जात होते. त्यांचं विमान धावपट्टीपासून ५० मीटर दूरवर कोसळलं.

    अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले. विमानात ६ जण असल्याचं सांगण्यात आलं. मग प्रत्यक्षात पाचच जणांचे मृतदेह कसे मिळाले? विमानाचे पायलट वारंवार का बदलण्यात आले? असे प्रश्न मिटकरी यांनी विचारले. शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केला. त्यांनी हा विषय थेट संसदेत उपस्थित केला.

    या अपघाताचे साक्षीदार असलेल्या कल्याण आटोळे यांनी संपूर्ण घटनाक्रम कथन केला. ते गोजूबावी गावचे सरपंच आहेत. ‘सकाळी ८.३५ ते ८.४० दरम्यान विमानानं गावाला दोन घिरट्या घातल्या. उतरायच्या वेळी विमान डावीकडे कललं आणि पुढच्या काही सेकंदांत विमान पडलं. आम्ही ते लांबून पाहिलं. त्यानंतर आम्ही सगळेच विमानाच्या दिशेनं धावलो. तेव्हा मोठ्या प्रमाणात धूर होता. पण जाळ जास्त मोठा नव्हता. विमान पुढच्या बाजूला पेटलेलं होतं. मी तिथे पोहोचल्यावर उजव्या बाजूला गेलो आणि निळ्या रंगांची पँट घातलेला एक माणूस मला ३ ते ४ सेकंद उघडलेल्या दरवाज्यात दिसला. केवळ ३ ते ४ सेकंदच तो मला दिसला,’ असं आटोळे यांनी सांगितलं.

    मी विमानाच्या जवळ उभा होतो. तितक्यात मला आमच्या गावातील एकानं आवाज दिला. त्यानं मला मागे होण्यास सांगितलं. स्फोट होण्याची भीती असल्याचं तो म्हणाला. त्यावेळी मी मागे सरकलो आणि मोठा स्फोट झाला. त्यानंतर विमानाचे तुकडे हवेत उडाले. स्फोट झाल्यावर मी डाव्या बाजूला गेलो. तर २०-२५ फुटांवर दादा पडलेले होते. पण दादांना आम्ही ओळखलं नाही. कारण ते विमान दादांचं आहे, हे आम्हा कोणालाच माहीत नव्हतं. त्याचवेळी किरण दादा गुजर तिथ आले. हे विमान दादांचं आहे आणि हे पडलेले दादा आहेत, असं गुजर यांनी सांगितलं. त्यानंतर गुजर मोठ्यानं रडू लागले. त्यामुळे आम्ही घाबरलो. आम्हाला काही कळेनासं, सुचेनासं झालं, असा घटनाक्रम आटोळे यांनी सांगितला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed