मंत्री आदिती तटकरे यांना अजित पवार यांच्याबाबत बोलताना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं होतं याबाबत त्यांनी भाष्य केलं. अजित पवार यांची उणीव प्रत्येक कार्यकर्त्याला दररोज भासेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनादेखील अश्रू अनावर झाले. आदिती तटकरे यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली तेव्हा त्या हमसून हमसून रडल्या. “आम्ही आमचा नेता गमावला. त्यांना परत बघता येणार नाही. हे कधीही न भरुन निघणारं दु:ख आहे. त्यांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिलं, आधार दिला. चांगलं काम केलं तर प्रशंसा करायचे. थोड्या कुठे चुका झाल्या तर हक्काने वडिलांसारखं ओरडायचे, मार्गदर्शन करायचे. एक दिवस असा गेला नाही की, दादांचं नाव तोंडातून निघालं नसेल. आम्ही पुढेही काम करत असताना प्रत्येक बाबतीत त्यांची आठवण येत राहील”, असं म्हणत असताना आदिती तटकरे यांना रडू कोसळलं.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “दादांच्या अकाली जाण्याने आम्ही सर्वजण मानसिकदृष्ट्या खचलेलो आहोत. त्यामुळे काही बोलण्याच्या मनस्थितीत आमच्यापैकी कुणी नाही”, अशी भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
“सगळ्या बाजूने दादांनी केलेल्या कामांचं कौतुक होत आहे. महाराष्ट्राने काय गमावलं याबाबत सर्व बोलत आहेत आणि ते ऐकायला आज दादा नाहीत. त्यांनी नेहमीच भरभरुन प्रेम दिलं. वडिलांचं जसं मार्गदर्शन मिळत आलं, तसं त्यांचंही नेहमी मिळत आलं. ते प्रोत्साहन देत राहिले. नेहमी तरुणांना, महिलांना, युवतींना संधी मिळाली पाहिजे, नवं नेतृत्व घडलं पाहिजे हेच त्यांचं नेहमी असायचं”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
“तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला कसं घडवायचं, त्याला ताकद कशी द्यायची, त्याला प्रशासकीय ज्ञान कसं द्यायचं, मला आठवतं की, मी 2019 मध्ये आमदार झाले त्यावेळी पहिलं भाषण कसं करायचं हे मी दादांकडून शिकले. अगदी बजेटचे मुद्दे कसे मांडायचे, पुरवणी मागण्या, भाग क्रमांक, पान क्रमांक बोलून कसं उठायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. सभागृह हे आधीसारखं नसणार आहे. आमच्या सगळ्यांचं आयुष्य सुद्धा त्यांच्याविना आधीसारखं नसरणार आहे”, अशा भावना आदिती यांनी व्यक्त केल्या.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा