• Wed. Jun 17th, 2026

    ‘शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही’, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

    ByMH LIVE NEWS

    Jan 26, 2026
    ‘शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही’, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
    पुणे 
    शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही आहेत”, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आहे. “लवासाची कीड काढून टाकली पाहिजे”, असादेखील घणाघात संभाजी भिडे यांनी केला आहे. तसेच संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी भिडे यांनी याआधीदेखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यावेळी त्यांनी दोन दिग्गज व्यक्तींबद्दल वादग्रस्त केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गुन्हा दाखल करण्याची मागणी

    संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “मी आताच थोड्या वेळापूर्वी संभाजी भिडे यांचं वक्तव्य ऐकलं. महाराष्ट्राचं मान शरमेनं खाली जाईल अशाप्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर देशाच्या जडणघडणीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आज प्रजासत्ताक दिवस आहे. संरक्षण खात्यात महिलांना संधी देणं असेल, कृषी क्षेत्रात प्रचंड मोठं काम, उद्योग क्षेत्रात खूप मोठं काम असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना आपल्याच राज्यात खूप मोठी संधी मिळते”, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर म्हणाले.”अशा मोठ्या व्यक्तीमत्वाने राष्ट्र उभारणीत आणि महाराष्ट्र उभारणीत खूप मोठं काम केलेलं असताना त्यांच्यावर अशा पद्धतीची भाषा वापरणं यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की, या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे”, अशी मोठी मागणी विकास पासलकर यांनी केली आहे.

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश तपासे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “वादग्रस्त वक्तव्ये आणि संभाजी भिडे यांचं पूर्वजन्माचं काहीतरी नातं मला दिसत आहे. एकीकडे तरुणांची माते भडकवायची, कुठेतरी इतिहासाचे चुकीचे संदर्भ द्यायचे, आणि ज्याने पराक्रम घडवला, ज्यांनी मागासवर्गीय समाजाला उभं केलं, ज्यांनी शेतकरी उभे केले, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी देशासाठी सेवा केली अशा शरद पवारांना उद्देशून काहीतरी वक्तव्ये करायची हे एक फॅशन झालेली आहे. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. पण संभाजी भिडे यांचं हे वक्तव्य चुकलं आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी दिली आहे.

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
    रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी विधि व न्याय विभागाचे मार्गदर्शन घ्यावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
    रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed