• Fri. Mar 6th, 2026
    Pune News : रस्त्यावर खेळताना अनर्थ, रोडरोलरने चिमुकल्याला चिरडलं, आईच्या डोळ्यासमोर लेकाचा करुण अंत; पुणे हळहळलं; Video

    Daund Child Crushed Under Road Roller : पुण्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याचं काम सुरु असताना रोडरोलर खाली येऊन एका चिमुकल्याचा बळी गेला आहे.

    दौंड रोड रोलरने मुलाला चिरडलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दिपक पडकर, पुणे (दौंड) : पुण्यातील दौंड शहरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या चिमुकल्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आर्यन जाधव असे चिमुकल्याचे नाव असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात, सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर घडली.

    रोडरोलरखाली चिमुकला सापडला

    मिळालेल्या माहितीनुसार, दौंड भागातील या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. आर्यन जाधव याची आई याच ठिकाणी मजूर म्हणून काम करत होती. काम सुरू असतानाच आर्यन हा रस्त्याजवळच खेळत असताना, भरधाव वेगाने मागे घेत असलेल्या रोड रोलरखाली तो सापडला. रोडरोलर चालकाचा वेग अत्यंत जास्त होता. लवकरात लवकर काम उरकण्याच्या नादात चालकाने आवश्यक ती खबरदारी न घेता रोलर फिरवला आणि क्षणात आर्यनचा जागीच चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर रोडरोलर चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे.

    Maharashtra TimesAhilyanagar Crime : अहिल्यानगरमधील खूनाचा अखेर उलगडा, भाच्याने झोपतच मामाला संपवलेलं, तो त्याला… पोलिसांचा त्या एका गोष्टीवरून तपास

    धक्कादायक बाब म्हणजे, डांबरीकरण सुरू असताना संबंधित रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला नव्हता. तसेच काम सुरू असल्याचे कोणतेही सूचनाफलक लावण्यात आले नव्हते. कठडे, बॅरिकेड्स किंवा सुरक्षात्मक उपाययोजना पूर्णपणे अनुपस्थित होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या कामावर कोणतीही देखरेख ठेवलेली नव्हती. तसेच कामाच्या ठिकाणी विभागाचे कोणतेही जबाबदार अधिकारी किंवा ठेकेदारांचे सुपरवायझर उपस्थित नव्हते. आर्यन जाधव याच्या मृत्यूनंतर देखील संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार घटनास्थळी फिरकले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
    Maharashtra TimesNagpur Crime : ‘चल OYOमध्ये जाऊ’; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला संपवलं, पोलीस भरती करणाऱ्या रुचिकाचा अंत; नागपूरमधील ‘त्या’ घटनेचा उलगडा

    चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरु

    या भीषण घटनेमुळे एका मजुरी करणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे एका निरागस चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. याप्रकरणी संबंधित ठेकेदार, रोडरोलर चालक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधींनी केली आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून फरार रोडरोलर चालकाचा शोध सुरू आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा