Badlapur Crime News : बदलापूर येथे स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. ज्या व्हॅनमध्ये ही घटना घडली. त्या व्हॅनबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
व्हॅनबाबत धक्कादायक माहिती उघड
बदलापूर पश्चिमेत स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे. तपासादरम्यान या स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत RTOने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Maharashtra Municipal Corporation Reservation : उत्तर महाराष्ट्रातही महिलाराज, नाशिक, जळगावसह अहिल्यानगरचे महापौरपद महिलांसाठी राखीव
स्कूल व्हॅनची तोडफोड
ही घटना उघड झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोडकरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता चेंदवनकर यांच्याकडून संबंधित व्हॅनवर दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, बदलापूर पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा चिमुकलीला स्कूल व्हॅनमधून शाळेत घेऊन जात होता. या दरम्यान त्याने चिमुकलीसोबत स्कूल व्हॅनमध्ये गैरवर्तन केले. यावेळी आरोपीने पीडित चिमुकलीला मारहाण देखील केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण खूप भयंकर असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून स्कूल व्हॅन चालकाला अटक केली आहे.
Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं! 4 वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाकडून संतापजनक कृत्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता चेंदवणकर या घटनेनंतर प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने काही नियम तयार केले होते. त्या नियामांचे पालन का झाले नाही? असा जाब त्यांनी विचारला आहे. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात संबंधित स्कूल व्हॅन आली तेव्हा चेंदवणकर आणि त्यांच्यासोबतच्या काही महिला कार्यकर्त्यांनी त्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.
