सोलापूरमध्ये भाजपने मोठा विजय प्राप्त केला, पण मुस्लिम कार्ड फेल ठरलं, प्रभाग क्रमांक 20 मध्ये काय घडलं?
प्रभाग 20 मध्ये भाजपचा मुस्लिम कार्ड सपशेल फेल
2017 साली सोलापूर महानगरपालिका निवडणूका झाल्या होत्या. आठ वर्षांपूर्वी भाजपने या मुस्लिम बहुल प्रभागात बिगर मुस्लिम उमेदवार दिले होते, त्यावेळी भाजपने दुसऱ्या क्रमांकाची मतं प्राप्त केली होती. 2017 मध्ये सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 21(जुन प्रभाग) एमआयएमने भाजपचा पराभव केला होता. तब्बल आठ वर्षानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने नवी शक्कल लढवत प्रभाग 20 (यंदाचा प्रभाग)मध्ये तीन मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.
Solapur Election Result: शेख, सय्यद भाजपचे उमेदवार, पण तिघेही पडले! ‘मुस्लिम कार्ड’ गंडलं अन् एमआयएम भारी पडलं; काय घडलं?
जानेवारी 2026 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही भाजपच्या तिन्ही मुस्लिम उमेदवारांचा पराभव एमआयएमने केला आहे. प्रभाग 20 आणि प्रभाग 14 या दोन प्रभागात सलग दुसऱ्यादा एमआयएमने सर्वच पक्षांवर मात दिली आहे. भाजपने प्रभाग 20 मध्ये मुस्लिम कार्ड खेळला होता,मात्र सपशेल फेल ठरले.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून ताकद लावली
प्रभाग 20 मध्ये एमआयएमच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तगडी फाईट दिली. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडूनही चार मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तौफिक इस्माईल शेख,अबूबक्कर सय्यद,कुरेषा मुल्ला,परवीन इनामदार या तिघांनी धर्मनिरपेक्ष पक्षाचा बोलबाला करत, जनते समोर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना वाटत होते, प्रभाग 20 मध्ये तौफिक शेख यांच्या मुळे राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनल विजयी होईल. प्रभाग 20 मधील जनतेने एमआयएम सोबत जाणे पसंद केले.
भाजपच्या तिन्ही मुस्लिम उमेदवारांना पडलेली मतं
प्रभाग 20 मध्ये भाजपने मुस्लिम कार्ड खेळला जरूर पण चालला नाही. वहिदा शेख यांना एकूण 2949 , अमीर शेख यांना 2334,जिशान सय्यद 2662 इतकी मतं पडली आहेत. वहिदा शेख या सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून वहिदा शेख यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली. अमीर शेख हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते होते. नगरसेवक निवडणुकीसाठी अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम केले, मात्र अचानकपणे अमीर शेख यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. जिशान सय्यद हे अनेक महिन्यापासून भाजपच कार्यकर्ता म्हणून काम करत होते. भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या गटातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
