Jalgaon Municipal Corporation Election Results 2026 : खानदेशातली सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीचा निकाल स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. कोण बाजी मारणार?
दरम्यान, राज्यातल्या 29 महापालिकांसाठी काल मतदान झाल्यावर आज सर्वत्र मतमोजणी सुरु असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, जळगावमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपने आपल पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्र. 19 मध्ये भाजपचे राजेंद्र घुगे पाटील ही विजयी झाले आहेत. राजेंद्र घुगे पाटील हे गेल्या पंचवार्षिकमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. आता त्यांची ही दुसरी टर्म आहे, त्यात ते विजयी झाले आहेत.
जळगावच्या प्रभाग १०ड मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी
फेर मतमोजणीसाठी प्रशासन तयार नसल्यामुळे कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या गोंधळ
पोलीस अधिकारी व कुलभूषण पाटील यांच्यामध्ये बाचाबाची
फेर मतमोजणीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांचा मतमोजणीच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन
प्रभाग १०ड मध्ये भाजपच्या उमेदवार जाहीर पठाण यांचा विजय झाला आहे
२०० मतांचा फरक असल्याने ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी फेर मतमोजणी केली आहे
फेरमतमोजणी करण्यास प्रशासन तयार नसल्याने कुलभूषण पाटील यांचे मतमोजणीच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन
मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त दाखल
