पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार लढत आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीकडून सत्ता मिळवली होती.
राज्यात भाजप सोबत सत्तेत असताना महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्याशी युती कशी काय केली, असा प्रश्न अजित पवार ांना विचारण्यात आला. त्यावर स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं. मी सुप्रिया सुळे यांना फोन केला. आमच्यात संवाद झाला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं. आमच्यातील चर्चा संपल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी युतीसाठी हात पुढे केला होता. पण तोपर्यंत वेळ निघून गेला होता. काही प्रभागांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत असल्याचं अजित पवार म्हणाले. ते एबीपी न्यूजशी बोलत होते.
सर्वात मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अजित पवारांचं महत्त्वाचं विधान
आमचं कुटुंब एक असल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर, शरद पवारांची साथ सोडल्यावर अजित पवारांनी काकांवर जोरदार टीका केली होती. तुम्ही कधीतरी थांबणार आहात की नाही, असा प्रश्न करत त्यांनी शरद पवारांच्या निवृत्तीचा प्रश्न जाहीर सभेतून उपस्थित केला होता. त्यावेळी पवारांच्या निवृत्तीवर तावातावानं बोलणाऱ्या अजित पवारांनी आता याच प्रश्नावर वेगळा सूर आळवला.
किती नगरसेवक फुटतील? एकनाथ शिंदेंचा फोन आलेला; निवडणुकीच्या रणधुमाळीत खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांनी राजकारणात सक्रिय राहायला हवं की निवृत्त व्हायला हवं, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी थेट कानावर हात ठेवले. ‘मी त्यांना कोणताही सल्ला देणार नाही. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. दिल्लीत त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्या कार्यक्रमात मी त्यांची ताकद पाहिली आहे,’ असं अजित पवार म्हणाले.
