मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राची नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान केले होते. यावर राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेत अण्णामलाई यांना लक्ष्य केले.
मी मुंबईला नक्की जाणार. हिंमत असेल तर माझे पाय कापून दाखवा, असं खुलं आव्हान अण्णामलाई यांनी दिलं आहे. चेन्नईत माध्यमांशी बोलताना अण्णामलाई यांनी राज यांना उघड आव्हान दिलं. मला धमकी देणारे राज ठाकरे, आदित्य ठाकरे कोण? असा सवाल अण्णामलाई यांनी विचारला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि अशा धमक्यांना घाबरत नाही, असं अण्णामलाई म्हणाले.
भाजप-MIMचे सूर पुनश्च जळले, युतीचे धागे पुन्हा विणले; पाच जणांचा पाठिंबा अन् गेम झाला
मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांचा उल्लेख रसमलाई असा केला. यानंतर मनसेच्या काही समर्थकांनी अण्णामलाई यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं. अण्णामलाई मुंबईत आले, तर त्यांचे पाय कापू, असा थेट इशारा मनसैनिकांकडून देण्यात आला. अशा धमक्या म्हणजे अज्ञान असल्याचं अण्णामलाई म्हणाले. जर मी घाबरत असतो, तर माझ्या गावालाच राहिलो असतो. मुंबई एक जागतिक शहर असल्याचं मी म्हणालो होतो. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असा दावा त्यांनी केला.
लेक है तो सेफ है! शिंदेंच्या पुत्राचा भाजपला धोबीपछाड; हायव्होल्टेज निवडणुकीत जोरदार धक्का
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात अण्णामलाई यांना लक्ष्य केलं. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांनी १९६०-७० च्या दशकात दिलेल्या हटाओ लुंगी, बजाओ पुंगी घोषणेचा उल्लेख केला. ‘काल परवा मुंबईत तमिळनाडूवरुन एक रसमलाई आली होती. तो विचारतो, मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध काय? अरे तुझा काय संबंध इथे यायचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाओ लुंगी आणि बजाओ पुंगी,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं. यानंतर शिवतीर्थावर जमलेल्या हजारोंच्या गर्दीनं त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
