नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची २० वर्षांनंतरची पहिली प्रचार सभा झाली. या सभेतून दोघांनी भाजपवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी मनसेच्या कामांची तुलना करत भाजपला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली.
ठाकरे बंधूंनी नाशिकमधून प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. पहिल्याच सभेतून दोघांनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी व्यासपीठावरील नेपथ्य रचनेनं लक्ष वेधून घेतलं. व्यासपीठावर ठाकरे बंधूंसह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव-राज यांचा एकत्र फोटो सगळ्या पाहुण्यांच्या मागे होता. हा फोटो बराच मोठा होता. दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा संदेश स्पष्ट देणारा फोटो लावण्यात आला होता.
दत्तक घेणारा बाप फिरकलाच नाही! राज ठाकरेंचा CM फडणवीसांवर थेट हल्ला; भलीमोठी यादीच वाचली
प्रमुख वक्त्यांच्या भाषणासाठी व्यासपीठाच्या मधोमध भगव्या रंगाचा पोडियम उभारण्यात आलं होतं. त्यावर दोन्ही पक्षांची निवडणूक चिन्हं होती. त्याखाली शिवशक्ती हा शब्द पांढऱ्या रंगात अगदी ठळकपणे लिहिण्यात आला होता. ठाकरे बंधूंच्या संयुक्त शक्तीच्या अनुषंगानं शिवशक्ती शब्द लिहिण्यात आला होता. ठाकरे बंधूंच्या युतीनंतरच्या पहिल्या प्रचार सभेत बाळासाहेबांसोबतचा दोन्ही ठाकरे बंधूंचा भव्य फोटो आणि पोडियमवरील शिवशक्ती शब्द लक्षवेधी ठरले.
Uddhav Thackeray: भ्रष्टाचारी तेतुका मेळवावा, चुनावी हिंदुत्व अन् रावणाचा पक्षप्रवेश; उद्धव ठाकरे भाजपवर तुटून पडले
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून मनसेनं २०१२ ते २०१७ या कालवधीत केलेली कामांचा उल्लेख केला. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची यादीच राज यांनी वाचून दाखवली. यातील किती प्रकल्प, योजना पूर्ण झाल्या, असा प्रश्न राज यांनी विचारला. त्यावर जमलेल्या गर्दीतून नकारार्थी उत्तर आलं. भाजपमध्ये सुरु असलेल्या इन्कमिंगवर राज यांनी सडकून टीका केली. दुसऱ्यांची पोरं कशाला मांडीवर घेता, असा थेट सवाल राज यांनी विचारला.
