BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेना-मनसेचा संयुक्त वचननामा आज जाहीर; आदित्य व अमित ठाकरेंनी मिळून तयारी केली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भातील माहिती दिली. वचननाम्यासाठी नवीन दमाचे नेते मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘भाजपने अमराठी महापौर बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर त्याची जबाबदारी असून ते पान खाऊन मराठी माणसांच्या तोंडावर पिचकारी मारत आहेत. कृपाशंकर सिंह हा भाजपचा ‘बोलका पोपट’ असून त्यांनी अनावधानाने नाही, तर जाणूनबुजून हे विधान केलेले आहे. त्यांना राज्यात इतरत्रही अमराठी महापौर करायचे आहेत. आता योगी आदित्यनाथ, सम्राट चौधरी असे अनेक नेते सक्रिय होतील,’ अशी टीका त्यांनी केली. ‘भाजपनेही काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले आहेत. त्यामुळे राणे पुत्र आता काय करणार आहेत?’ असे राऊत म्हणाले.
BMC Election 2026: भाजपनं उमेदवारी नाकारताच शिल्पाताईंची भलतीच युक्ती; आता अख्खा पक्ष गॅसवर, शिंदेसेनेलाही टेन्शन
उमेदवारांना पाच-दहा कोटी?
‘महापालिका निवडणुकांसाठी भाजप त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्मसोबत पाच कोटी देत आहे, तर शिवसेनेच्या उमेदवारांना एकनाथ शिंदे १० कोटी देत आहेत,’ असा आरोप राऊत यांनी केला. आमच्या पक्षातील काहींनी अपक्ष अर्ज भरले आहेत, पण त्यांनी तमाशे केलेले नाहीत. काहींनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. त्यावर बोलताना, ‘हे आरोप नाहीत, तर सत्य आहे.
आपण विधानसभा अध्यक्ष आहोत, हेच राहुल नार्वेकर विसरले आहेत. विधानसभा अध्यक्षांसाठी नियम, संकेत आहेत की, त्यांनी अशा राजकीय कार्यक्रमांत सहभागी व्हायचे नसते. मात्र, कमळाबाईंचे उपरणे टाकून ते घरातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेल्याचे आम्ही पाहिले. तिथे त्यांनी विरोधकांना धमकावले. राज्यात काय चालले आहे, हे विचारण्याचीच सोयच उरलेली नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
BMC Election: कार्यकर्ते रस्त्यावर पण उमेदवारी ‘घरातच’, घराणेशाहीवर टीका; तरी मुंबईत 8 ठिकाणी ‘या’ नेत्यांच्या नातलगांनाच संधी
नार्वेकर यांचे प्रत्युत्तर
राहुल नार्वेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘पराजय होत असताना राऊत बिनबुडाचे आरोप करत आहेत. उबाठाने दुपारी १ वाजता एबी फॉर्म दिले. वेळेत दिले असते, तर त्यांच्या उमेदवारांना अर्ज भरता आले असते. मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून भूमिका निभावतो, तेव्हा निष्पक्ष असतो. माझ्या मतदारसंघात मी आमदार म्हणून काम करतो. मी काय काम करावे, हा सल्ला देण्याची गरज नाही,’ असा टोला नार्वेकर यांनी राऊत यांना लगावला.
