Mumbai Elections: मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाकडून अनेक नेत्यांच्या नातलगांना उमेदवारी देण्यात आली आहे. घराणेशाहीवर टीका करणाऱ्या शिवसेनेतच मुंबईत तोच जुना खेळ पुन्हा दिसून आला आहे.
माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली शेवाळे यांना प्रभाग क्र.१८३ मधून, माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया यांना अनुक्रमे १९४ आणि १९१ मधून उमेदवारी मिळाली आहे. कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय यांना प्रभाग क्र.१६९ मधून तिकीट मिळाले आहे. चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला यांना प्रभाग क्र. १६३ मधून तिकीट मिळाले. चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी आपल्या घरात तन्वी काते आणि समृद्धी काते या दोघींना उमेदवारी दिली आहे. भांडुपचे आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रूपेश पाटील यांना क्र. ११३मधून, खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकरला क्र. ७३ मधून उमेदवारी दिली आहे.
Palghar News : रविंद्र चव्हाण यांच्यासमोरच भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा संताप, वसईत नेमकं काय घडलं?
माजी आमदाराला उमेदवारी
शिवसेनेने माजी आमदार यामिनी जाधव यांना प्रभाग क्र. २०९ मधून मुंबई महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले आहे. माजी आमदार दिवंगत श्रीकांत सरमळकर यांची सून पल्लवी सरमळकरला प्रभाग क्र.९४ मधून तिकीट मिळाले. माजी नगरसेवक संध्या विपुल दोषी, राजू पेडणेकर, राजुल पटेल, सुवर्णा करंजे, संजय तुरडे, तृप्ती विश्वासराव, अमेय घोळे, अनिल कोकीळ, नाना अंबोले यांनाही उमेदवारी दिली आहे. माजी आमदार मंगेश सातमकर, दीपकबाबा हांडे यांच्या घरात उमेदवारी दिली आहे.
नवीन वर्ष सत्तेचं जावो! शिवतीर्थावरुन निघताना उद्धव ठाकरेंना शुभेच्छा; माजी CM लगेच म्हणाले…
भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली आहे. त्यानुसार भाजप १३७ तर ७ तर शिंदे गट ९० गट ९० जागा लढवत आहे. मात्र, प्रभाग क्रमांक २२५ मध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या प्रभागात भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भावजय हर्षिता नार्वेकर यांना तर शिंदे यांच्या शिवसेनेने सुजाता सानप यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे या प्रभागात युतीचा अधिकृत उमेदवार कोण हे शुक्रवारी स्पष्ट होईल.
