Chhatrapati Sambhajinagar Elections: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. येथे महायुतीच्या जागावाटपावरुन शिंदेसेनेत नाराजीनाट्य सुरु असल्याचं चित्र आहे.
ते प्रभाग सोडणं पक्षाला परवडणारं नाही – राजेंद्र जंजाळ
आम्ही पालकमंत्री साहेबांना मुख्य समन्वय समितीचे प्रमुख म्हणून सांगायला आलो आहे की, शिवाजीनगर वार्ड ज्याने शिरसाट साहेबांवर भरभरुन प्रेम केलं. त्यांना सर्वात जास्त मतदान त्या वार्डातून झालं आहे. असं असतानाही शिवाजीनगर प्रभागात फक्त एक जागा त्यांनी आपल्याला सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर २१ नंबरचा प्रभाग, त्या प्रभागात कोणत्याही निवडणुकीच्या निकालात शिरसाट साहेबांना आणि भुमरे साहेबांना भरघोस मतदान झालं आहे. एवढी आपली बाजू तिथे भक्कम असताना ते प्रभाग सोडून देणं पक्षाच्या दृष्टीने परवडणारं नाही. प्रभाग क्रमांक २२ मध्ये दोन दिले, दोन आपल्याला दिले, ते ठीक आहे, पण या दोन प्रभागांमध्ये आपले मतदार आहेत. ते सगळे मतदार बांधव इथे आले आहेत जे शिरसाट यांना प्रश्न विचारत आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केलं मग आमचं चुकलं का? त्यामुळे हा प्रस्ताव मान्य करण्यात येऊ नये, प्रभाग क्रमांक २१ मध्ये किमान एक जागा सोडावी, प्रभाग क्रमांक २७ मध्ये किमान दोन-तीन जागा सोडण्यात याव्या. ज्याप्रकारे त्यांनी सातारा-देवळे येथील चारही प्रभाग घेतले त्याच पद्धतीने तेवढंच प्रेम त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये करावं, अशी विनंती करण्यासाठी मी आणि वॉर्डातील सर्व मतदार आले आहेत, असं राजेंद्र जंजाळ म्हणाले.
NCP: महायुतीत बिघाडी,अजित पवार गटाची ‘एकला चलो रे’ची भूमिका; 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
तसेच, कदाचित शिरसाट साहेबांनी या बुथवर झालेलं मतदान पाहिलं असेल, तरी त्यांनी हा प्रस्ताव मान्य करु नये, हिच आमची विनंती होती, असंही त्यांनी सांगितलं.
त्यांना भाजपला या जागा सोडायच्या होत्या म्हणून त्यांनी मला प्रक्रियेतून बाहेर केलं – राजेंद्र जंजाळ
मी कालपर्यंत त्या प्रक्रियेत होतो, कालपासून मी त्यातून बाहेर आहे. कदाचित त्यांना या जागा भाजपला सोडायच्या होत्या म्हणून त्यांनी या प्रक्रियेतून मला बाजुला केलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
