Accident News: पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भरधाव टेम्पोने दोन्ही मैत्रिणींना उडवले
प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय १७) ही विद्यार्थिनी मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी प्रज्ञा आणि तिची मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे (वय १७, रा. नजीक पिंपरी) या दोघी दुचाकीवरून कॉलेजला निघाल्या होत्या. नजीक पिंपरी परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूने सोलापूर जिल्ह्यात हळहळ
शुक्रवारी सकाळी भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेली स्नेहल वाघमोडे हिला तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्नेहलची प्रकृती चिंताजनक होती. तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्नेहल ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, मोहोळ येथे ११ वी सायन्समध्ये शिकत होती. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा असा अपघाती मृत्यू झाल्याने मोहोळ तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
