Mohol Local Body Election Result: सोलापूर जिल्ह्यातील एका नगरपालिकेच्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. वय, संघर्ष आणि राजकीय गणित बदलणाऱ्या या विजयाची इनसाईड स्टोरी….
घरची परिस्थिती बेताची
सिद्धी वस्त्रे या महाविद्यालयीन तरुणीने महाराष्ट्र राज्यातील राजकारणात इतिहास घडविला आहे. बीकॉम संपल्यानंतर एम कॉमला प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बेताची असल्याने सीएकडे सात हजार पगारीवर नोकरी केली. कुटुंबाला हातभार लावत स्पर्धा परीक्षा द्यायची आणि नोकरी करण्याचं स्वप्न सिद्धीने बघितलं होत. तीस वर्षापूर्वी आजोबा मोहोळ गावचे सरपंच होते. वडिलांनी मात्र राजकारणात न जाता सर्वसाधारण नोकरी स्वीकारली होती.
Election Result 2025 : 1 आमदार न् 1 खासदार, तरीही हाती निराशाच, परभणीत ठाकरे बॅकफूटवर; शिंदेंच्या शिलेदारांनी झेंडा फडकवला
आई गृहणी असून दोन भाऊ आणि एक बहीण असा सिद्धीचा परिवार आहे. मध्यम वर्गातील सिद्धीने थेट नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे. आई वडिल आणि दोन्ही भावंडांनी प्रचारात माझ्यासाठी वाहून घेतले होते. आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत मी नगराध्यक्ष झाले, असे सिद्धीने सांगितले.
आमदार व्हायचे स्वप्नं पडू लागलेत
सिद्धी वस्त्रे या नवनियुक्त नगराध्यक्षक तरुणीने पुढे बोलताना प्रतिक्रिया दिली की, नगराध्यक्ष झाले आता आमदार होऊन आणखीन जनतेची सेवा करणार, असे तिने सांगितले आहे.
माझ्या या यशात खारीचा वाटा उमेश पाटील, रमेश बारसकर आणि आई वडील यांचा आहे ,त्यामुळे यांच्या मदतीने पुढे मी मोहोळची आमदार होणार, असं सिद्धीने सांगितले आहे.
