Nashik Crime : राज्यात गुन्हेगारीचं चित्र असताना नाशिकमधील सटाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
रेनॉल्ड्स ट्यूबर चारचाकी…
सटाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 41 बीई 4645 या रेनॉल्ड्स ट्यूबर चारचाकी वाहनातून बनावट नोटा शहरात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. यात्रास्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तात्काळ हालचाल सुरू झाली. यानुसार बनावट नोटा असलेल्या टोळीने सटाणा ताहाराबाद मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले. या ठिकाणी त्यांना बनावट नोटा देत असतानाच पोलिसांनी रंगेहाथ पकडलं.
Raigad Crime : पुण्याची आठवण करून देणारा ‘हगवणे’सदृश प्रकार, सासरी विवाहितेला… रायगड जिल्ह्यातील पेणमधील घटना
4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
या टोळीत हर्षल आबासाहेब नंदन (वय 20), अनिकेत विलास नवरे (वय 20), जयेश तुकाराम पवार (वय 20), गौरव संजय पवार (वय 30, सर्व रा. ताहाराबाद), शुभम दादाजी गवळी (वय 28), प्रफुल रवींद्र गवळी (वय 29 ), श्याम दादाजी गवळी (वय 27, सर्व रा. अंतापूर) बागलाण तालुक्यातीलच असल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे. सटाणा पोलिसांनी या युवकांकडून चार महागडे मोबाइल, एक चारचाकी वाहन असा सुमारे 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात असून, लवकरच बनावट नोटा छापल्या जाणाऱ्या ठिकाणाचा शोध घेण्यात येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. या घटनेचे धागेदोरे संभाजीनगर, नागपूरपर्यंत पोहोचत असल्याचं समजतं.
Rahul Dhikale : भाजपने आधी कॅप्टन बदलला, दोनच दिवसात निर्णय फिरवला; डॅमेज कंट्रोलसाठी मोठी रणनीती
नोटा स्वीकारण्यास नकार
या घटनेनंतर यात्रेतील व्यापारी, दुकानदार व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक जण 500 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास धजावत नसल्याचं चित्र आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिक व यात्रेकरूंना 500 रुपयांच्या नोटा देताना व घेताना विशेष सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. कोणतीही संशयास्पद नोट आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर 500 रुपयांच्या नोटांचा वापर झाल्यानं त्या व्यवहारांवरही संशयाची सुई फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
