भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आज घरकुल योजनेचा निधी मिळत नाही या मुद्द्यावरुन सभागृहात प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले.
तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी अर्धा तास चर्चा क्रमांक 11. सुधीर मुनगंटीवार आहेत का?, असा प्रश्न केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी “हो, आहे. इकडेच आहे. अहो माढी साईजही मोठी आहे. दिसलो पाहिजे”, असं म्हणाले. यानंतर तालिका अध्यक्षांनी पण मंत्री महोदय आहेत का? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार भडकले.
“मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही. ती तुमची आहे. आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री उपस्थित नसल्यावर त्यांच्यावर बिबट्या सोडा. हे धंदे आता बंद करा”, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी तालिका अध्यक्षांना सुनावलं. यावेळी तालिका अध्यक्षांना अधिकाऱ्यांनी मंत्री सभागृहात उपस्थित असल्याची माहिती दिली. त्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्याला का सांगितंल नाही, सांगितलं असतं तर आपण कशाला असा प्रश्न केला असता, असं बोलताना बघायला मिळाले. यानंतर सुधीर मुनगंटीवार हे आपला प्रश्न मांडतात.
सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
“ग्रामीण भागात असणाऱ्या गरीब भटक्या-विमुक्त जातीमध्ये येणाऱ्यांसाठी ही चर्चा मी उपस्थित केलेली आहे. राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत जे शेवटच्या प्रवाहात आहेत त्या लोकांसाठी 2011 मध्ये घरकुल योजना करण्यात आली. 2011 मध्ये ही योजना करण्यात आली तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव योजनेला दिलं. 70 हजार रुपयांच्या योजनेवरुन 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंतचा निधी वाढवला. पण अध्यक्ष महाराज, बोलाची कडी, आणि बोलाची भात असं या योजनेचं झालं.”
प्रसाद लाड यांना सभागृहात बोलताना अचानक विजेचा शॉक लागला अन्…, पाहा नेमकं काय घडलं?
“तुम्ही महाराष्ट्रात किती घरकूल मंजूर केले, यावर मी जात नाही. पण आता यशवंतराव घरकूल योजनेत ज्या भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांचे घरकूल मंजूर आहे त्यांना पैसे दिले जात नाहीत. 1 हफ्ता दिला की, दुसऱ्या हफ्त्यासाठी वाट पाहावी लागते. बिरबलाची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही.”
“मला तुमच्याकडून स्पष्ट आश्वासन हवं आहे. कारण आमच्या मतदारसंघात 96 कोटींचा निधी आवश्यक आहे. मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत. पण भटक्या विमुक्त नागरिकांसाठी पैसे नसतील तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे. रेती दिली जात नाही, निधी दिला जात नाही, मग करायचं काय? तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर भटक्या विमुक्त जातींना न्याय दिला पाहिजे.”
PM Modi Cabinet Decision : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय, 2027 मध्ये देशभरात 2 टप्प्यात जनगणना होणार, त्यानंतर…
मंत्र्यांकडून मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर
मंत्री अतुल सावे यांनी त्यावर उत्तर दिलं. “सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ सदस्य आहेत. मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की, या पुरवणी मागणीमध्ये या योजनेसाठी 300 कोटी मंजूर झाले आहेत. शंभर टक्के निधी ताबोडतोब दिला जाईल”, अशी ग्वाही मंत्री अतुल सावे यांनी दिली.
