भाजप आमदार प्रसाद लाड यांना आज सभागृहात भूमिका मांडत असताना माईकला हात लागला असता विजेचा शॉक लागला. त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली.
विधान परिषदेच्या सभागृहात भाजप आमदार आज आपली भूमिका मांडण्यासाठी उठले. यावेळी ते माईकवर बोलत असताना त्यांचा माईकला हात लागला. पण या माईकला हात लागताच त्यांना विजेचा शॉक लागला. सुदैवाने प्रसाद लाड सुखरुप आहेत. त्यांनी तातडीने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना याबाबत तक्रार केली. पण याच मुद्द्यावरुन सभागृहात काही काळ आमदारांमध्ये प्रचंड हास्यकल्लोळ बघायला मिळाला.
“माईकला हात लावला की शॉक लागतो. आर्थिंगचा प्रोब्लेम असेल. एक चित्रपट होता बघा, माईकवर बोलता बोलता शॉक लागतो. तसं होईल. सभापती महोदय, हे थोडसं सांगून आर्थिकची व्यवस्था करा. मी कालही हे सांगितलं होतं. कारण शॉक लागून मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल”, असं प्रसाद लाड म्हणाले. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर सभापती राम शिंदे यांनी भूमिका मांडली. “त्याची पूर्ण खबदारी घेण्याचं आमचं नियोजन आहे. अशी हानी होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय”, असं सभापती म्हणाले.
PM Modi Cabinet Decision : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय, 2027 मध्ये देशभरात 2 टप्प्यात जनगणना होणार, त्यानंतर…
यानंतर प्रवीण दरेकर यांनी एक मिश्किल वक्तव्य केलं. “आम्ही तुमचा पुतळा बांधू”, असं प्रविण दरेकर मस्करीत म्हणाले. यानंतर प्रसाद लाड यांनी मस्करीत खंत व्यक्त केली. “सभापती महोदय असे मित्र असतील, विरोधक बाजू घेत आहेत आणि हा म्हणतोय पुतळा बांधतो”, असं प्रसाद लाड म्हणाले आणि सभागृहातील सर्व आमदारांमध्ये प्रचंड हास्यकल्लोळ बघायला मिळाला.
माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोण धमकी देतंय? सभागृहात सांगितला थरकाप उडवणारा प्रकार
“सभापती महोदय थोडं खेळतं वातावरण तयार केलं”, असं प्रसाद लाड म्हणाले. यानंतर सभापती राम शिंदे हे पुन्हा भूमिका मांडू लागले. “खेळतं म्हणजे तुम्ही सभागृहाचे लाड आहात आणि चांगला प्रसाद दिलाय. त्यामुळे…”, असं म्हणत सभापती देखील हसू लागले.
अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राजकीय संघर्ष
या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन आमनेसामने आलेले बघघायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात खाली आहेत. ही पदं भरली जावीत यासाठी विरोधी पक्षांकडून प्रचंड मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय वाद होताना दिसत आहे. तसेच विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
