शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया कशासाठी?
गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवचगळून पडत आहे. ग्रामदैवत श्री. कसबा गणपती तमाम गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, म्हणून सध्या असलेले शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
Nashik News: ‘कर्ज मिटवू’ म्हणत सही घेतली पण… शेतकऱ्यासोबत पतसंस्थेने केला कोट्यवधींचा घोटाळा, नेमकं काय घडलं?
शेंदूर कवच काढण्याकरीता विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ही प्रक्रिया विशेषत: श्रींच्या मुख्य रोजच्या पूजेच्या मूर्तीवर करण्यात येणार आहे.
कालावधी कमी होऊ शकतो
शेंदूर कवच काढणे व त्याअनुषंगाने आवश्यक ती कामे ही सर्व प्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्यामुळे साधारण तीन आठवडे लागणे अपेक्षित आहे. कदाचित हा कालावधी कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो. मात्र याचा अंदाज प्रत्यक्ष काम सुरु झाल्यावरच येईल. इथून पुढे होणा-या कामाचा योग्य आढावा घेऊन मंदिर लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करण्याचा व्यवस्थापन समितीचा अत्यंत प्रामाणिक मनोदय आहे.
Solapur Accident : पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ, ऑर्डर घेण्यासाठी आनंदात निघाले, बाईकला बसची धडक; दोन व्यावसायिकांचा करुण अंत
अनेक कारणांसाठी इतिहासात प्रसिद्ध
पुण्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक, ग्रामदैवत अशी कालातीत उपाधी प्राप्त असलेले श्री. कसबा गणपती मंदिर अनेक कारणांसाठी इतिहासात प्रसिद्ध आहे. इसवी सन 1614च्या आसपास या मंदिराचे उल्लेख आढळतात. जय मिळवून देणारा असा जयति गजानन असे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचे वर्णन केले आहे. मंदिर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असून, पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यत या मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे.
