Solapur Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सोलापूमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात उत्तर प्रदेशमधील दोघांचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे.
रस्त्यावर रक्ताचा सडा पडला
दुचाकी आणि एसटीचा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी वेगात असल्याने एसटी बसच्या उजव्याबाजूच्या एसटी समोरील भागाचा पत्रा फाटून दुचाकी एसटी खाली घुसली होती. दोघेही तरुण गंभीर जखमी झाल्याने बार्शी सोलापूर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.रक्त मोठ्या प्रमाणात वाहत होते. अपघातात मरण पावलेले दोन्ही तरुण हे उत्तर प्रदेश राज्यातील असून सोलापूर मार्केट वार्ड परिसरात बऱ्याच वर्षापासून ते राहत होते.
Pune Metro: पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी; मेट्रो आता थेट ग्रामीण भागातही पोहोचणार, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ
अपघातात मृत्यू झालेले अतुल तिवारी आणि देवेंद्रसिंग बघेल हे दोघे केटरिंग व्यवसाय करत होते. सोलापूरहून बार्शी तालुक्यातील वैराग येथे केटरिंग व्यवसायाची ऑर्डर घेण्याकरिता जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळाली. मयत देवेंद्रसिंग बघेल हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तर त्याचा मित्र अतुल तिवारी हा अविवाहित होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. वा अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
Pune News : पुण्यातील सह्याद्री रुग्णालय फोडलं, शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तोडफोड; प्रकरण काय?
चिमुकल्या शंभूनं आजोबांच्या कुशीत जीव सोडला
बार्शी सोलापूर मार्गावर काळीज पिळटवून टाकणारी घटना घडली आहे. काल मंगळवारी बार्शी सोलापूर मार्गावर भीषण अपघात घडला आहे. भीषण अपघातात आजोबा आणि दोन वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
