महाराष्ट्रातलं एक गाव सध्या चर्चेत आहे. या गावात सुरु झालेल्या यात्रेमुळे हे गाव सर्वत्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे देशभरातून हजारो घोडे या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे गाव म्हणजे सारंगखेडा.
सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील श्री. दत्त भगवान यात्रेस 4 डिसेंबर पासून सुरुवात झाली. महानुभाव पंथीयांचे हे श्रद्धा स्थान असलेल्या या ठिकाणी श्री. दत्तांचे एकमुखी मूर्ती आहे. भारतात पुष्कर येथे देशातील सर्वात मोठा अश्व बाजार भरतो. त्यानंतर दोन नंबरवर सारंगखेडा येथे बाजार भरत असतो. देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात यासह विविध राज्यातून विविध जातीचे सुमारे 2800 च्या वर घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
सध्या घोडे बाजार तेजीत असून मंगळवारी 40 तर सोमवारी 78 घोड्यांची विक्री झाली. घोड्यांच्या विक्रीतून आतापर्यंत सुमारे 1 कोटी 53 लाख 99 हजार 600 रुपयांची उलाढाल झाली आहे. सारंगखेडा यात्रेला परिसरातील जीवनदायी यात्रा म्हटले जाते. या यात्रेच्या माध्यमातून जवळपास 20 हजार नागरिकांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असतो.
अश्वस्पर्धांना झाली सुरुवात
सारंगखेडा (ता.शहादा) येथे दत्त जयंतीपासून एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रोत्सव सुरु आहे. येथील अश्व बाजार देशभर प्रसिद्ध आहे. अश्व बाजाराला बदलत्या परिस्थितीनुसार नवा आयाम मिळावा यासाठी जयपालसिंह रावल यांनी चेतक फेस्टिवल सुरु केला आहे. या चेतक फेस्टिवलमध्ये (ता.९) मंगळवार पासून अश्वांच्या विविध स्पर्धांना थाटात शुभारंभ झाला . त्यात प्रथम मंगळवारी अश्वांच्या रेवाल चाल स्पर्धांनी प्रारंभ झाला.
इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर प्रहार, श्रीकांत शिंदे यांचं लोकसभेत मतचोरीवर आक्रमक भाषण
दुपारी दोन वाजता रेवाल चाल स्पर्धा झाल्या. यात ३६ अश्वांचा सहभाग घेतला. नवाब , रुद्रा , अल्स्कब , नटराज , गुलसफर, शेरा, बादशाह, पवन, टायगर, बादल या अश्वांमध्ये अंतिम स्पर्धा झाली. स्पर्धेत परभणी येथील अल्स्कब या अश्वाने प्रथम क्रमांक मिळून बाजी मारली. तर द्वितीय पुरणपूर येथील गुलसफर या अश्वांला गौरविण्यात आले. तर तृतीय बरेली (उत्तर प्रदेश) येथील आसिफ भाई यांचा पवन या अश्वांला गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून रुद्रा या अश्वाला गौरविण्यात आले.
‘हे विधिमंडळ माझ्या खिशात आहे’, अधिकाऱ्याच्या वल्गना, अनिल परब यांचा सभागृहात गंभीर आरोप
चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते अश्वाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेडी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल उपस्थित होते. अश्व रेवाल चाल स्पर्धा म्हणजे घोड्यांच्या वेगाची आणि कौशल्याची एक शर्यत आहे, जिथे घोडे विशिष्ट चालीमध्ये (रेवाल चाल) धावतात. यावेळी चेतक फेस्टिवल मार्फत तयार करण्यात आलेल्या धावपट्टीवर धावणारे घोडे पाहून हजारो प्रेक्षकांनी आपल्या चक्षुनी डोळ्याचे पारणे फेडले.
