वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना अनेकदा काही स्वार्थी लोक लाच देवून आपलं काम करुन घेण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लोकांना सावध करणारी नेमप्लेट नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात बघायला मिळत आहे.
राजेश खवले यांच्या नेमप्लेटची सध्या चर्चा होत आहे. सरकारी कामे करत असताना अनेक जणांकडून आपली कामे लवकर व्हावीत किंवा एखादे बेकायदेशीर काम कायदेशीर करुन द्यावे, यासाठी अनेक जण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचादेखील प्रयत्न करतात. तर काही जण गोड बोलून अधिकाऱ्यांना हवं तसं कृत्य करण्यास भाग पाडतात. पण अशा लोकांना राजेश खवले यांनी आपल्या नेमप्लेटवरुनच सावध केलं आहे. त्यांच्या नेमप्लेटमुळे तशाप्रकारच्या विचारांची व्यक्ती लाच देण्याचं धाडसही करणार नाही. त्यामुळे राजेश खवले यांच्या नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
‘Ravindra Chavan माझ्या मोठ्या भावाप्रमाणे’, आमदार निलेश राणे यांचं वक्तव्य, दोघांची दिलजमाई
कोण आहेत राजेश खवले?
अमरावती जिल्ह्यातील माहुली जहांगीर या गावात राजेश खवले यांचा जन्म झाला. प्रशासकीय सेवेत रुजू व्हायची इच्छा असल्याने त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले. १९९८ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात येणाऱ्या विविध परीक्षा दिल्या. ते सुरुवातीला मंत्रालयीन सहायक म्हणून रुजू झाले. त्यानंतर पुन्हा एमपीएससीची परीक्षा देऊन २००० मध्ये उपजिल्हाधिकारी बनले. राजेश खवले २००१ मध्ये अमरावती येथे परिवेक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे उपविभागीय अधिकारी बनले. वर्धा, यवतमाळ, वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. गोंदिया येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर आता ते नागपुरात महसूल अपर आयुक्त म्हणून कार्यरत आहे.
‘गोवा अग्नितांडवा’च्या घटनेवर ठाण्यात राजकारणाचा ‘भडका’, मनसे आणि भाजप ॲक्शन मोडवर
सामाजिक जाण असलेला अधिकारी म्हणून राजेश खवले ओळख आहे. महात्मा फुले यांच्यावर लेख संग्रहित करून त्यांनी क्रांतीरत्न गौरवग्रंथ प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. सावित्रीबाई फुले यांच्यावरही त्यांनी गौरवग्रंथ काढला. पक्षिशास्त्राचीही त्यांना आवड आहे. या विषयावरील त्यांचे दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली.
